VIDEO : बाबरने रागात दिल्या शिव्या! रौफने पुढच्या चेंडूवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eng vs pak

VIDEO : बाबरने रागात दिल्या शिव्या! रौफने पुढच्या चेंडूवर...

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडने शानदार खेळ दाखवत विजेतेपद पटकावले. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने रविवारी MCG येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी सहा चेंडू बाकी असताना पूर्ण केले.

हेही वाचा: Shoaib Akhtar : तोंड पाडून रडत शोएब म्हणतो... 'इंशाअल्लाह भारतात वर्ल्ड कप...'

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम शांत दिसत असला तरी त्याची दुसरी बाजू मेलबर्नच्या मैदानावर दिसली. खरं तर, टी-20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने त्याचा सहकारी खेळाडू हरिस रौफला शिवीगाळ केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Yuvraj Singh: युवीने ENG चॅम्पियन झाल्यावर केलं अनोखं विधान! 'ससुराल वालों...'

इंग्लंडच्या डावाच्या चौथ्या षटकात ही घटना घडली. पाकिस्तानने 20 षटकांत केवळ 137 धावा केल्या होत्या, त्यामुळे पाकिस्तानला सुरुवातीला विकेट्सची नितांत गरज होती. शाहीनने विकेट घेतली, पण हरिस रौफला त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिलने चौकार मारला. यानंतर बाबर आझम हारिस रौफला काहीतरी बोलतांना दिसला. हा व्हिडिओ शेअर करत एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले, 'बाबर आझमने शिवीगाळ केली का?'

या घटनेनंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाने आपली खरी ताकद दाखवत पुढच्याच चेंडूवर फिलला इफ्तिखार अहमदकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर हॅरिसने पुढचे पाच चेंडू डॉट बॉल टाकले.