esakal | पाकिस्तानची इंग्लंडमध्ये लाजीरवाणी कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानची इंग्लंडमध्ये लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्तानची इंग्लंडमध्ये लाजीरवाणी कामगिरी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या बाबार आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पाकिस्तान संघाचा तीन एकदिवसीय सामन्यात 3-0 च्या फरकाने मानहाणीकारक पराभव झाला आहे. इंग्लंडच्या दुय्यम दर्जाच्या संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने तिन्ही एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाने दिलेल्या 332 धावांचं आव्हान 48 व्या षटकांत पार केलं.

बाबर आझमची(158) शतकी खेळीला मोहम्मद रिजवान (74) आणि इमाम उल हक (56) यांच्या अर्धशतकाचं बळ मिळालं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं निर्धारित 50 षटकांत 331 धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तान संघानं दिलेल्या 332 धावांचं आव्हान जेम्स विन्स याच्या शतकी खेळीच्या बळावर सहज पार केलं.

हेही वाचा: नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

वेन्स यानं आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे. वेन्स याने 95 चेंडूत 102 धावा चोपल्या. वेन्सच्या शतकी खेळीमुळे बाबर आझमची अर्धशतकी खेळी वाया गेली. वेन्सशिवाय लिव्हिस जॉर्ज यानेही महत्वाची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तान संघाचा इंग्लंडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने तर दुसऱ्या सामन्यात 52 आणि पहिल्या सामन्यात 9 धावांनी पराभव केला होता.

हेही वाचा: फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

हेही वाचा: काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

loading image