ENG vs IND बुमराहचा अनोखा अंदाज; पॅड बांधून केली बॉलिंग

बॅटिंगऐवजी गोलंदाजी करताना पॅड घातले मग चर्चा तर होणारच ना!
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah Twitter

England vs India Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करताना दिसत आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) नेटमध्ये घाम गाळताना दिसतोय. नेट्समध्ये सराव करताना पॅड बांधून खेळणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण एखाद्याने बॅटिंगऐवजी गोलंदाजी करताना पॅड घातले मग चर्चा तर होणारच ना! जसप्रित बुमराहच्या बाबतीतही असचं काहीस घडतंय.

Jasprit Bumrah
इंग्लंडवारीपूर्वी सूर्या-पृथ्वीचा कोरोना रिपोर्ट आला

बीसीसीआने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन जसप्रित बुमराहचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये बुमराह चक्क पॅड बांधून बॉलिंग करताना दिसतोय. दोन्ही पायात पॅड असूनही तो सहजपणे गोलंदाजी करताना दिसते. बुमराहच्या या अनोख्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण यावर मजेदार कमेंट्सची बरसात करताना दिसते. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, फक्त एवढेच बघायचे राहिले होते. बॉलिंग करुन पुन्हा बॅटिंगला लगेच येण्यासाठी बुमराहने ही शक्कल लढवलीये, अशी मजेदार कमेंट्स एकाने केली आहे.

Jasprit Bumrah
हॉकीत भारतीय संघाच्या धमाकेदार 'ट्रेलर'मागे चित्रपटाची प्रेरणा

जसप्रित बुमराहला इंग्लंड दौऱ्यावरील अनुभव आहे. यापूर्वी बीसीसीआयने ट्रेंट ब्रिजच्या मैदानातील खेळपट्टीचा एक फोटो शेअर केला होता. हिरवळीनं बहरलेल्या खेळपट्टीवर बुमराह अप्रतिम गोलंदाजी करेल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी 2018 मध्ये बुमराहने या मैदानात 5 विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीसह त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com