esakal | सचिन-विराट पाठोपाठ 'या' खेळाडूंचा चार दिवसांच्या कसोटीला विरोध!
sakal

बोलून बातमी शोधा

4-Day-Test-Cricket

आयसीसीची क्रिकेट समिती मार्चमध्ये या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. 27 ते 31 मार्च या कालावधीत दुबईमध्ये आयसीसीची बैठक होणार आहे.

सचिन-विराट पाठोपाठ 'या' खेळाडूंचा चार दिवसांच्या कसोटीला विरोध!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

केपटाऊन : चारदिवसीय कसोटी क्रिकेटच्या प्रस्तावाला यापूर्वी सचिन तेंडुलकर, शोएब अख्तर, टीम पेन, विराट कोहली यांनी विरोध दर्शविला आहे. यात आता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने यांनीही विरोध केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर बोलताना त्याने आयसीसीच्या या प्रस्तावावर सडकून टीका केली. इंग्लंडविरुद्ध झालेली कसोटी पाचव्या दिवसापर्यंत रंगली.

- U19 World Cup : आयसीसीने सिलेक्ट केले भारताकडून एकमेव पंच!

सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, "मी पाच दिवसांच्या कसोटीचा चाहता आहे. कसोटी पाचव्या दिवसापर्यंत खेळविली जात नाही म्हणून खूप खर्च होत आहे, याची मला कल्पना आहे. मात्र, या प्रस्तावावर समान मतप्रवाह असतील. मी अशा अनेक सामन्यांमध्ये खेळलो आहे, ज्यांचा निकाल पाचव्या दिवशी लागला आहे. अशा सामन्यांचा निकाल चौथ्या दिवशी लागणे खूप कठीण होते.'' 

- दोस्ती अन् कुस्ती : हर्षवर्धन-शैलेशच्या खिलाडूवृत्तीचा मेरी-झरीनने घ्यावा आदर्श!

माहेला जयवर्धनेनेसुद्धा या प्रस्तावाला विरोध केला आहे. तो आयसीसीच्या क्रिकेट समितीचा सदस्यही आहे. तो म्हणाला, "आपण यावर मार्चमध्ये चर्चा करणारच आहोत. मात्र, माझ्यामते कसोटी ही पाचच दिवसांची असावी. मला यात कोणताही बदल अपेक्षित नाही.'' 

- विराटने कर्णधार म्हणून टी20मध्ये केला 'हा' विक्रम; धोनीलाही टाकले मागे

आयसीसीची क्रिकेट समिती मार्चमध्ये या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. 27 ते 31 मार्च या कालावधीत दुबईमध्ये आयसीसीची बैठक होणार आहे. 2023नंतर इंग्लंडने या कल्पनेला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियासुद्धा या योजनेचा गांभीर्याने विचार करत आहे.