

FIFA World Cup 2026 Final | Spain vs Argentina
Sakal
FIFA World Cup 2026 Final, Spain vs Argentina: फुटबॉल हा सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने या खेळाचे चाहते जगभर आहेत. फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे फिफा वर्ल्ड कप, सध्या या स्पर्धेचे २३ वे पर्व अमेरिकेत सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असून फायनल रविवारच्या रात्री (१९ जुलै) गतविजेते अर्जेंटिना आणि स्पेन या संघात खेळला जाणार आहे.
हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२.३० वाजता सुरू होणार असल्याने साधारण मध्यरात्री ३ पर्यंत संपेल. त्यामुळे भारतात हा सामना पाहायचा असेल, तर मात्र चाहत्यांना रात्री उशीरापर्यंत जागावं लागणार आहे. याचाच विचार करता भारतातील तीन राज्यातील शाळांना त्यांच्या राज्य सरकारकडून थेट सुट्टी जाहीर झाली आहे.