KL Rahul : हे सर्व काय आहे? आमचं धोरण... राहुलच्या निवडीवरून विश्वविजेत्या संघाचा निवडसमिती अध्यक्ष नाराज

KL Rahul Asia Cup 2023
KL Rahul Asia Cup 2023 ESAKAL

KL Rahul Asia Cup 2023 : आशिया कप 2023 साठी भारतीय निवडसमितीने टीम इंडियाची घोषणा केली. यावेळी 15 ऐवजी 17 खेळाडूंचा संघ निवडण्यात आला. यावेळी संजू सॅमसनला देखील स्टँड बाय म्हणून ठेवण्यात आले. मात्र दुखापतग्रस्त केएल राहुलची निवड करण्यात आली. पाठीच्या दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरने देखील बऱ्याच महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

मात्र या संघनिवडीवर भारताचा 2011 चा वर्ल्डकप विजेता संघ निवडणारे माजी निवडसमिती अध्यक्ष के. श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी दुखापत असलेल्या केएल राहुलला संघात निवडण्यास विरोध केला आहे. श्रीकांत यांनी आगरकच्या नेतृत्वाखालील निवडसमितीवर प्रश्न उपस्थित केला.

KL Rahul Asia Cup 2023
Chandrayaan 3 Mumbai Indians : चंद्र घेतला कवेत आता... मुंबई इंडियन्सने रोहितचा फोटो शेअर करत दिले मोठे संकेत

श्रीकांत आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, 'सांगण्यात येत आहे की केएल राहुल अजून दुखापतग्रस्त आहे. जर तो दुखापतग्रस्त असेल तर त्याला संघात घेणे योग्य नाही. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असेल तर तुम्ही त्याची निवड करू नये. आमचे धोरण तरी असेच होते.'

'निवडीदिवशी कोणी दुखापतग्रस्त असेल तर त्याची आम्ही संघात निवड करत नव्हतो. जर तुम्ही त्याला वर्ल्डकप संघात निवडू इच्छिता तर त्याला वर्ल्डकप संघासाठी निवडा. तो एक वेगळा मुद्दा आहे. आता ते सांगत आहे की तो काही सामन्यांनंतर खेलू शकतो. त्यामुळे आम्ही त्याचा बॅकअप म्हणून आम्ही संजू सॅमसनला देखील घेऊन जात आहोत. हे सर्व काय आहे?'

KL Rahul Asia Cup 2023
Chandrayaan 3 : सराव, जेवण सोडून बसले होते डोळे लावून; टीम इंडियाही झाली चांद्रयान 3 मोहीमेची साक्षीदार

यंदाचा आशिया कप हा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंका येथे हायब्रीड पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारताचा पहिला सामना हा 2 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत आहे.

याचबरोबर भारतीय संघ नेपाळसोबत देखील खेळणार आहे. भारताने यासाठी 17 खेळाडूंचा संघ निवडला आहे. यात जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांची देखील निवड केली आहे. हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त होते. आता ते आयर्लंड दौऱ्यावर टी 20 मालिका खेळत आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com