Commonwealth Games : मुसळधार पावसात भारताच्या गुरवीर सिंगनं घडवला इतिहास! वाऱ्याच्या वेगासारखा धावत जिंकलं मेडल; Video

Gulveer Singh’s Historic Silver at Glasgow CWG 2026: ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या गुरवीर सिंगने इतिहास घडवला आहे. त्याने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतासाठी ऐतिहासिक मेडल जिंकले. त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Commonwealth Games Glasgow 2026

Gulveer Singh’s Historic Silver at Glasgow CWG 2026

Sakal

Updated on

Commonwealth Games Glasgow Marathi news: मुसळधार पाऊस...आणि ट्रॅकवर सुरू असलेली १० हजार मीटरची थरारक शर्यत... सुरुवातीला गर्दीमध्ये कुठे तरी मागे असणारा एक भारतीय धावपटू शेवटच्या फेऱ्यांमध्ये अचानक असा काही वेग घेतो की, समोरच्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत थेट ऐतिहासिक रौप्य पदकावर नाव कोरतो... हे कोणतं चित्रपटातलं दृश्य नाही, तर उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा सिरसा गावातून आलेल्या गुलवीर सिंगने (Gulveer Singh) ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत करून दाखवलेली खरीखुरी कमाल आहे.

सध्या ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मंगळवारी (२८ जुलै) १० हजार मीटर शर्यतीत २७ वर्षंच्या गुरवीर सिंगने रौप्य पदक जिंकलं आहे.

Commonwealth Games Glasgow 2026
Commonwealth Games: कारगिल योद्ध्यांना विजय समर्पित... पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडविल्यानंतर भारताच्या जादुमानीची भावना
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com