झहीर खानचा अनफिट हार्दिक पंड्याला मोलाचा सल्ला, म्हणाला...

वृत्तसंस्था
Tuesday, 4 February 2020

तंदुरुस्तीच्या मार्गावर असताना तुम्हाला संयम राखावा लागतोच, तुमच्यासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफ, डॉक्‍टर, फिजिओ, ट्रेनर यांचा सल्ला ऐकावा लागतो.

मुंबई : भारतीय संघात परतण्यासाठी पूर्ण तंदुरुस्ती मिळव, त्यासाठी कोणतीही घाई करू नको, असा सल्ला भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने हार्दिक पंड्याला दिला आहे. मुंबई इंडियन्सच्या एका कार्यक्रमात झहीर खान बोलत होता.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झहीर खान मुंबई इंडियन्स संघाचा संचालक आहे. दुखावलेल्या पाठीवर शस्त्रक्रिया झालेला हार्दिक सप्टेंबरपासून क्रिकेट खेळलेला नाही. 29 मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या अगोदर तो तंदुरुस्त होण्याची शक्‍यता कमी आहे.

- मोहम्मद शमीच्या घरी आली 'नन्ही परी'; फॅमिलीने दिली गुडन्यूज!

आयपीएल अजून दूर आहे. 120 टक्के तंदुरुस्त झाल्यावरच हार्दिकने पुनरागमनाचा विचार करावा, असे झहीर म्हणतो. अशा प्रकारच्या दुखापतीचा मीही सामना केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कधी पुनरागमन करता यापेक्षा कसे पुनरागमन करता हे महत्त्वाचे असते, असेही झहीरने सांगितले. झहीरलाही अनेकदा दुखापतींमुळे संघाबाहेर रहावे लागलेले आहे.

- INDvsNZ : सुपरओव्हर खेळायला जाण्यापूर्वी रोहित विसरला होता 'ही' महत्त्वाची गोष्ट!

तंदुरुस्तीच्या मार्गावर असताना तुम्हाला संयम राखावा लागतोच, तुमच्यासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफ, डॉक्‍टर, फिजिओ, ट्रेनर यांचा सल्ला ऐकावा लागतो. केवळ हार्दिकलाच नव्हे तर संयम बाळगण्याचा सल्ला मी प्रत्येकाला देईन, पूर्ण तंदुरुस्ती न मिळवता संघात पुन्हा खेळण्याची घाई करणे चुकीचे आहे, असे मत झहीरने मांडले. 

- Video : तुमच्यासाठी कायपण; सचिनने दिलेलं चॅलेंज कांबळीनं केलं पूर्ण!

भारतीय संघाचे कौतुक

न्यूझीलंडमध्ये ट्‌वेन्टी-20 मालिकेत मिळवलेल्या 5-0 यशाबद्दल झहीर खानने टीम इंडियाचे कौतुक केले. न्यूझीलंडचा संघ सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. एकदिवसीय मालिकेतही त्यांना भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी शर्थ करावी लागेल. भारतीयांना केवळ मिळालेली लय कायम ठेवायची आहे, असे झहीरने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardik Pandya should not rush for comeback in Team India says Zaheer Khan