
रोहितचे सुपर ओव्हरमध्ये खेळणे टीम इंडियासाठी किती महत्त्वाचे होते, ते सगळ्या क्रिकेट फॅन्सनी पाहिले.
INDvsNZ : हॅमिल्टन : भारत-न्यूझीलंड या संघांदरम्यान झालेली पाच टी-20 सामन्यांची मालिका भारताने जिंकली. या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना सुपर ओव्हरपर्यंत चालला. या दोन्ही सामन्यांत भारताने बाजी मारली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हॅमिल्टन येथे रंगलेली तिसऱ्या टी-20 सामन्याची सुपर ओव्हर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. हिटमॅन रोहित शर्मा या सामन्याचा सुपरहिरो ठरला होता. पण सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी रोहित अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरला होता, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
टी-20, वन-डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही फॉरमॅटमध्ये सध्या रोहितचा बोलबाला सुरू आहे. पण रोहित किती विसराळू माणूस आहे, याचे अनेक किस्से टीम इंडियातील त्याचे अनेक टीममेट्स सांगत असतात. कॅप्टन विराट कोहलीनेही रोहित एवढा विसराळू माणूस मी पाहिला नसल्याचे एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
- Video : तुमच्यासाठी कायपण; सचिनने दिलेलं चॅलेंज कांबळीनं केलं पूर्ण!
'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन' या गौरव कपूरच्या वेब सीरीजमध्ये कोहलीने रोहित आयपॉड, व्हिसा, वॉलेट, मोबाईल, रिंग आणि बॅट गोष्टी विसरून जातो याचे किस्से सांगितले होते. त्यानंतर दस्तुरखुद्द रोहितनेही आपण या गोष्टी विसरलो होतो, याची कबुलीही दिली होती. एखादी गोष्ट रोहितला सापडली नाही, तर तो नवीन घेऊ असं म्हणायचा. याचा अर्थ तो ती गोष्ट विसरून आलाय असं समजायचं, असं विराटने म्हटले होते.
- भज्जी आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बाॅलिवूडच्या सेटवर
रोहित कधी काय विसरू शकतो याची ताजी घटना नुकतीच घडली होती. तिसऱ्या सामन्याच्या सुपर ओव्हरपूर्वी ड्रेसिंगरूममध्ये घडलेला एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 18 धावांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाची रोहित-राहुल ही जोडी मैदानात उतरणार होती. राहुल मैदानात जाण्यासाठी तयार झाला होता. पण रोहित पॅड बांधून ड्रेसिंग रुममध्येच घुटमळत असल्याचे कॅप्टन कोहलीच्या लक्ष्यात आले.
- INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!
काही टेन्शन आहे का?याची खात्री करण्यासाठी विराटने रोहितला विचारले तेव्हा कोहलीलाच जास्त टेन्शन आले होते. कारण रोहित त्याचं अॅबडोमन गार्ड विसरला होता. गार्ड सापडत नसल्यामुळे रोहित ड्रेसिंग रुममध्येच घुटमळत होता. त्याच्याऐवजी श्रेयसला बॅटिंग करण्यासाठी पाठव, असंही त्याने विराटला कळवले होते, अशी माहिती त्याने मॅच संपल्यानंतर मीडियाशी बोलताना दिली होती.
मॅच सुरू होण्यास दोन मिनिटं शिल्लक राहिली असताना रोहितला त्याचे गार्ड सापडले. आणि तो मैदानात उतरला. त्यानंतर जे झाले ते अविश्वसनीय होते. रोहितचे सुपर ओव्हरमध्ये खेळणे टीम इंडियासाठी किती महत्त्वाचे होते, ते सगळ्या क्रिकेट फॅन्सनी पाहिले.