मोहम्मद शमीच्या घरी आली 'नन्ही परी'; फॅमिलीने दिली गुडन्यूज!

टीम ई-सकाळ
Monday, 3 February 2020

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वादविवाद सुरू आहेत. त्याच्या पत्नीने शमी आणि त्याच्या घरच्यांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती.

नवी दिल्ली : भारत-न्यूझीलंड दरम्यान रविवारी (ता.2) झालेली शेवटची पाचवी टी-20 मॅच जिंकत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. टी-20 सीरिज जिंकल्याची घटना ताजी असतानाच आता मोहम्मद शमीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शमीच्या घरी एका लहान परीचे आगमन झाले असल्याचे त्याने जाहीर केले. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका लहान मुलीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी त्याने त्याच्या फॅन्सना दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Looking so sweet beta love you so much god bless you beta see you soon 

A post shared by Mohammad Shami , محمد الشامي (@mdshami.11) on

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी वर्षातील पहिली सीरिज जिंकली आहे. तसेच किवीजच्या भूमीवर त्यांनाच व्हाईटवॉश देण्याचा ऐतिहासिक पराक्रमही केला आहे. या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा मोठा वाटा आहे. अत्यंत मोक्याच्यावेळी त्याने घेतलेल्या विकेट्स टीमला यश मिळवून देण्यात कामी आल्या. तिसरी टी-20 मॅचही शमीनेच भारताच्या बाजूने वळविली होती. 

रोहित शर्माने जरी ही मॅच भारताला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी शमीचा वाटाही तितकाच महत्त्वाचा होता. या विजयानंतर शमीच्या घरी आणखी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. शमीच्या भावाला मुलगी झाली असून तिचा फोटो शमीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

- INDvsNZ : सुपरओव्हर खेळायला जाण्यापूर्वी रोहित विसरला होता 'ही' महत्त्वाची गोष्ट!

या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये शमीने म्हटले आहे की, 'आमच्या घरी एक गोड मुलगी जन्माला आली आहे. या सुंदर परीचे आमच्या घरी आणि या जगात स्वागत. आणि भावाला खूप खूप शुभेच्छा.' 

- Video : तुमच्यासाठी कायपण; सचिनने दिलेलं चॅलेंज कांबळीनं केलं पूर्ण!

दरम्यान, मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वादविवाद सुरू आहेत. त्याच्या पत्नीने शमी आणि त्याच्या घरच्यांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. तसेच शमीच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोपही हसीनने केला होता. या सगळ्यातून बाहेर पडत शमीने क्रिकेटवर पूर्ण फोकस केले असून त्याच्या कामगिरीतही ते दिसून येत आहे. 

- भज्जी आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बाॅलिवूडच्या सेटवर

गेल्या वर्षी झालेल्या 7 कसोटी मॅचमध्ये त्याने 31 विकेट घेतल्या असून तो टेस्ट रँकिंगच्या टॉप टेन यादीत दाखल झाला आहे. वन-डेमध्येही त्याने 18 मॅचमध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत शमीने 4 मॅचमध्ये 14 विकेट घेतल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने हॅट्ट्रिक नोंदविली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mohammed shami shared a good news on social media with photo of new born baby girl