'धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही!'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

जसप्रीत बुमराप्रमाणेच हार्दिकनेसुद्धा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) उपचार घेतलेले नाहीत. रिहॅबच्या काळात त्याने एनसीएपेक्षा घरीच राहणे पसंत केले होते. 

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून लांब होता. पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने हार्दिक संघाबाहेर होता. मात्र, आता दुखापतीतून बरे झाल्यानंतर तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आगामी न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी हार्दिकची भारत अ संघात निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंड दौरा आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याची तंदुरुस्ती ही त्याच्यासाठीच नाही, तर संघासाठीही महत्त्वाची बाब ठरणारी आहे.

दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही क्रिकेटपासून दूर असल्याने संघाला तळात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची जागा भरण्याचा प्रश्न भेडसावत आहे. धोनीची जागा भरून काढण्याचा दबाव पंड्यावर वाढत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मी धोनीची जागा कधीच घेऊ शकत नसल्याचे पंड्या म्हणाला.

- Video : मराठमोळ्या स्मृतीने घेतलेला अफलातून कॅच होताेय व्हायरल

 

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना पंड्याला याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी तो म्हणाला, 'मी सध्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी तयारी करत आहे. माझी कामगिरी ही संघाच्या विजयात भर टाकणारी असेल. टी-20 वर्ल्डकप आपणच जिंकणार यादृष्टीने मी विचार करत आहे. मात्र, मी धोनीची जागा कधीच घेऊ शकत नाही.' 

श्रीलंका दौऱ्याला सुरवात होण्याअगोदर पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने तळात फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची संघाला गरज आहे. आणि त्यांच्याकडून अशा कामगिरीची अशी कामगिरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे धोनीची अनुपस्थिती संघाला भेडसावत असून संघ व्यवस्थापन त्याला पर्याय शोधत असल्याचे दिसून येत आहे. 

- महाराष्ट्र केसरी 2020 : बक्षिसाची रक्कम मिळालेलीच नाही; काका पवारांचा गौप्यस्फोट

 

भारत अ संघातून पुनरागमन 

पाठीच्या दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी हार्दिक सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यात तो संघात दाखल होण्याची शक्‍यता आहे. या दौऱ्यापूर्वी भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघात दोन सराव सामने होणार आहेत. यामध्ये हार्दिक खेळणार आहे. या दोन्ही सामन्यांमधून त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी घेतली जाणार आहे. 

- सचिन-विराट पाठोपाठ 'या' खेळाडूंचा चार दिवसांच्या कसोटीला विरोध!

भारत अ संघातील खेळाडू रविवारी न्यूझीलंडसाठी रवाना होतील. भारत अ संघाच्या सपोर्ट स्टाफकडून त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी होईल. जसप्रीत बुमराप्रमाणेच हार्दिकनेसुद्धा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) उपचार घेतलेले नाहीत. रिहॅबच्या काळात त्याने एनसीएपेक्षा घरीच राहणे पसंत केले होते. 

''हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयने निवड समितीली कळविले आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केली जाईल. त्यानंतर तो पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघात सहभागी होईल.'' 
- बीसीसीआयचे अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardik Pandya spoke about former Team India captain Mahendra Singh Dhoni