esakal | लग्नाआधीच हार्दिक पंड्यानं दिली गुडन्यूज ..येणार नवा पाहुणा..

बोलून बातमी शोधा

hardik pandya

 हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेटमधील एक सनसनाटी नाव...मैदानावर भलतीच तुफानी टोलेबाजी करण्याची क्षमता असलेला आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारा हार्दिक कधी काय करेल आणि कसा वागेल आणि काय बोलेल याचाही नेम नाही.

लग्नाआधीच हार्दिक पंड्यानं दिली गुडन्यूज ..येणार नवा पाहुणा..
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेटमधील एक सनसनाटी नाव...मैदानावर भलतीच तुफानी टोलेबाजी करण्याची क्षमता असलेला आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारा हार्दिक कधी काय करेल आणि कसा वागेल आणि काय बोलेल याचाही नेम नाही. कॉफी विथ करण या करण जोहर यांच्या कार्यक्रमात महिलाविषयी केलेले वादग्रस्त वतव्य त्याला चांगलेल भोवले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत बीसीसीआने काही काळ त्याच्यावर बंदीही घातली होती. 

त्याचे वर्तन कसेही असले तरी क्रिकेटमधील क्षमतेमुळे तो भारतीय क्रिकेट संघाला आणि त्याच्या असंख्य चाहत्यांनाही हवाहवासा वाटतो...याच आपल्या चाहत्यांना त्याने आज गोड बातमी दिली आहे. लवकरच आमच्याकडे नवा पाहुणा येणार आहे, असे सांगत त्याने नताशाबरोबचे छायाचित्र इंस्टावर पोस्ट केले आहे. 

हेही वाचा: मोठी बातमी! यावर्षी 'अशी' असणार बाप्पाची मूर्ती..परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

तसे पहायला गेले तर ही बातमी गोडच पण अनेकांच्या भूवया उंचावल्या कारण लग्नाअगोदरच तो पप्पा होणार आहे. भारतीय संघातील बॅचलरची संख्या कमी होत चालली आहे. हार्दिकही पाठी कसा राहिल. सब्रियाची मॉडेल नताशा सँन्कोविचबरोबर त्याची ओळख झाली आणि पुढे प्रेमही फुलले.

खर या हार्दिक आणि नताशा यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या अधून मधून येत होत्या अखेर 1 जानेवारी रोजी नताशाबरोबर आपण एगेजमेंट झाल्याचे त्याने जाहीर केले. यॉटवर हा सोहळा पार पडला होता. पण लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती. 

हेही वाचा: ''मला गर्भपाताची परवानगी द्या'' ; कोणी केली मागणी?..वाचा.. 

आपल्या कुटूंबात नवा पाहूणा येणार असल्याचे त्याने आज सोशल मिडियावरून जाहीर केले आणि एकच चर्चा सुरु झाली. हार्दिक सध्या त्याचा भाऊ कृणाल पंड्यासह बडोद्यातील घरीच रहात आहे. नताशाही त्याच्याबरोबर आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच जण घरी आहेत. आता हार्दिक लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

hardik pandya will be become father before marriage