त्या ९० मिनिटांमुळे 'विराट' खेळी झाली शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli
त्या ९० मिनिटांमुळे 'विराट' खेळी झाली शक्य

त्या ९० मिनिटांमुळे 'विराट' खेळी झाली शक्य

विराट कोहलीने मोठ्या सामन्यात मोठी खेळी करत आरसीबीला नितांत गरजेचा विजय मिळवून दिला. विराटच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे 169 धावांचे आव्हान 8 गडी राखून पार केले. गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झगडणाऱ्या कोहलीने विराट खेळी केलेली पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला. झालेल्या या सामन्यानंतर विराटनं आपल्या यशस्वी खेळीवर भाष्य केलं.

हेही वाचा: भारतासाठी आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकून देण्याची इच्छा : विराट

विराटने गुजरातच्या राशिद खानच्या चेंडू वर षटकार ठोकत 33 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यादरम्यान कोहलीने टी 20 मधील 7,000 धावा पुर्ण केल्या आहेत. गुजरातविरुद्ध विराटने शानदार पुनरागमन करत 73 धावा केल्या.

सामन्यानंतर विराटने माध्यामांशी संवाद साधला. '' ही एक महत्त्वाची मॅच होती. माझ्या मनात गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या संघासाठी काही करु शकत नाही याची खंत होती. त्यामुळे मी खुप त्रस्त होतो. त्याचा परिणाम आजच्या खेळीवर पाहायला मिळाला''. त्यामुळे मी खुप आनंदी आहे.

तसेच, "तुम्ही सादर केलेली कामगिरी तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुमचा दृष्टिकोन योग्य ठेवण्याची गरज आहे. सामन्याच्या एकदिवस आधी मी नेटमध्ये ९० मिनिटे सतत सराव केला. या सामन्यात येण्यापूर्वी मी सज्ज होतो." अशा खुलासा विराटने केला आहे.

यासोबतच "या आयपीएलमध्ये मला मिळालेला पाठिंबा पाहून खूप आनंद झाला. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमीच सर्वांचा ऋणी राहीन." अशी भावनादेखील त्यानं यावेळी व्यक्त केली.

सध्याच्या त्याच्या निराशजनक फॉर्मवरही त्याने भाष्य केलं. त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या टप्प्यातून जात आहे. सध्या तो तो यश किंवा अपयशाचा विचार करत नाही. मी मैदानावर जे काही करतोय त्यात मला स्वतःचे महत्त्व दिसत नसल्याचेही विराटनं यावेळी सांगितलं.

हेही वाचा: GT vs RCB : कोहलीची विराट खेळी; आरसीबी पोहचली चौथ्या स्थानावर

कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वर्षांपूर्वी शतक ठोकले होते. त्यानंतर त्याची खेळा फ्लॉप ठरताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमद्धे त्याची कागमिरी अत्यंत निराशजन ठरली आहे.

विराटच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे 169 धावांचे आव्हान 8 गडी राखून पार केले. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत 16 गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहचली आहे.

Web Title: I Batted 90 Minutes In Nets A Day Before Virat Kohli On His Form Regaining Knock Against Gt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLRCBVirat kohliIPL 2022
go to top