Ibrahim Zadran Noor Ali Zadran : पुतण्यानं दिली काकाला पदार्पणाची कॅप; पहिल्याच सामन्यात दिली शतकी सलामी

Afghanistan Ibrahim Zadran Noor Ali Zadran : अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहीम जादरानच्या काकानं वनडेनंतर तब्बल 15 वर्षांनी केलं कसोटी पदार्पण
Ibrahim Zadran Noor Ali Zadran
Ibrahim Zadran Noor Ali Zadranesakal

Cricket News Afghanistan : क्रिकेट वर्तुळात भावांच्या, भावा-बहिणींच्या, नवरा बायकोंच्या अनेक जोड्या आपण पाहिले आहेत. वेस्ट इंडीजचा दिग्गज शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकत्र खेळले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काका - पुतण्याची जोडी एकत्र खेळण्याची घटना कदाचित घडली नव्हती. त्यात पुतण्यानेच आपल्या काकाला पदार्पणाची कॅप देणं हा तर दुर्मिळ क्षण!

मात्र हा अजब प्रकार अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये घडली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पुतण्या - काकाची जोडी खेळली.

Ibrahim Zadran Noor Ali Zadran
Ind vs Eng 2nd Test Day 4 Live : ब्रेकनंतर इंग्लंडला मोठा धक्का! श्रेयसच्या 'त्या' थ्रोवर कर्णधार स्टोक्स आऊट

इब्राहीम जादरानने काका नूर अली जादरानला दिली पदार्पणाची कॅप

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यात काका - पुतणे अशा दोन पिढ्या एकाच सामन्यात खेळल्या. पुतणा इब्राहीम जादरानने आपला काका नूर अली जादरान यांना पदार्पणाची कॅप सोपवली. याचबरोबर या दोघांनी शतकी भागीदारी देखील रचली.

सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेकीपूर्वी इब्राहीमने आपल्या काकाला नूर अली यांना पदार्पणाची कॅप दिली. ही जोडी नाणेफेकीनंतर सलामीला देखील उतरली. मात्र अब्राहीम शुन्यावर बा९ झाला. तर नूर अलीने 46 चेंडूत पाच चौकारांसह 31 धावा केल्या.

Ibrahim Zadran Noor Ali Zadran
Video : वडापाव पॉवर फक्त 0.45 सेकंद...! कर्णधार रोहित शर्माचा अविश्वसनीय' कॅच' ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट

मात्र दुसऱ्या दुसऱ्या डावात या काका - पुतण्याच्या जोडीने शतकी भागीदारी रचली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 42.5 षटकात 106 धावांची शतकी भागीदारी रचली. इब्राहीमने चांगली फलंदाजी करत शतक ठकोलं. नूर अली यांनी 2009 मध्ये आपला वनडे डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांना कसोटी पदार्पण करण्यासाठी तब्बल 15 वर्षे वाट पहावी लागली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर श्रीलंकाने पहिल्या डावात 439 धावा केल्या. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने 259 चेंडूत 141 धावांची खेळी केली. तर दिनेश चांडीमलने 107 धावांची शतकी खेळी केली. हा सामना कोलंबोत खेळला जात आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com