ICC World Cup 2023 Anthem : दिल जश्न बोले... चहलची पत्नी अन् रणवीर सिंहचा तडका, ICC ने केले वर्ल्डकपचे अँथम साँग

ICC World Cup 2023 Anthem
ICC World Cup 2023 Anthemesakal

ICC World Cup 2023 Anthem: आयसीसी पुरूष वनडे वर्ल्डकप 2023 सुरू होण्यास अवघे काही दिवस शल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयसीसीने वर्ल्डकपचे अँथम साँग दिल जश्न बोलो अधिकृतरित्या प्रसिद्ध केले. हे अँथम साँग संगीतकार प्रीतम यांनी तयार केले असून त्यात अभिनेता रणवीर सिंह आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील झळकले आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

ICC World Cup 2023 Anthem
World Cup 2023 : वर्ल्डकपआधी संघाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाजाच्या अंगठ्यावर होणार शस्त्रक्रिया

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 चे अँथम साँग हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शन प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. हे अँथम साँग चाहत्यांमध्ये चांगलेच लोकप्रीय होत आहे. या गाण्यामध्ये रणवीर सिंह ब्लेजर आणि हॅट घालून एका ट्रेनमध्ये धमाल करताना दिसतोय. या व्हिडिओत सर्व 10 देशांच्या चाहत्यांना आपल्या देशाची जर्सी घालून जल्लोष करताना आपण पाहू शकतो.

रणवीर या व्हिडिओत ट्रेनमध्ये बसलेल्या एका मुलाला क्रिकेट फॅन होणं म्हणजे काय हे समजावून सांगत असतो. या व्हिडिओत भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील नृत्य करताना दिसते. रणवीर आणि प्रीतम तर ट्रेनच्या छतावर देखील डान्स करत आहेत.

ICC World Cup 2023 Anthem
Ganesh Chaturthi 2023 : सूर्यकुमार, तिलक लालबागचा राजाच्या चरणी लीन, Video पाहून चाहते म्हणतात...

यंदा पूर्णपणे भारतात होणाऱ्या वर्ल्डकपची सुरूवात ही 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारत आपली मोहीम 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याने करणार आहे.

भारतीय संघाने आशिया कप जिंकला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे 12 वर्षानंतर मायदेशात वर्ल्डकप खेळणाऱ्या भारतीय संघाकडून चाहते पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्याची अपेक्षा करत आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com