ICC ODI Rankings 2025: आयसीसी ‘वनडे’ रँकिंग जाहीर! रोहित शर्मा अव्वल क्रमाकांवर कायम; ‘टॉप–10’मध्ये भारताचे चार 'बॅट्समन'

Indian batsmen in Top 10 ICC ODI Ranking : जाणून घ्या, बाबर आझमच्या फ्लॉप शोचा विराट कोहलीला नेमका कसा झाला फायदा?
Rohit Sharma retains the No.1 spot in ICC ODI Rankings 2025 as four Indian batsmen feature in the Top 10 list.

Rohit Sharma retains the No.1 spot in ICC ODI Rankings 2025 as four Indian batsmen feature in the Top 10 list.

esakal

Updated on

ICC Announces Latest ODI Rankings 2025 : आयसीसीने लेटेस्ट वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या नव्या रँकिंगमध्ये भारताच्या किंग कोहलीने अर्थात विराट कोहलीने टॉप फाईव्हमध्ये जागा पटकावली आहे.  जरी टीम इंडियाने या आठवड्यात एकही एकदिवसीय सामना खेळला नसली, तरी बाबर आझमच्या फ्लॉप शोमुळे कोहलीसोबतच श्रीलंकेच्या चरिथ असलंकाला फायदा झाला आहे. तर बाबरची मात्र दोन स्थानांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, या यादीत  भारताचा हीटमॅन रोहित शर्माने मात्र आपले अव्वल स्थान कायम राखलं आहे. 

आयसीसी रँकिंगनुसार ७८१ गुणांसह रोहित शर्मा नंबर वन वनडे फलंदाज आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात दुसऱ्या एकदिवस मालिकेत ७३ आणि तिसऱ्या एकदिवसीय मालिकेत नाबाद १२१ धावांची खेळी खेळली होती. विशेष म्हणजे, काही आठवड्याआधीच रोहित शर्मा अव्वल क्रमांकवर आला होता, त्यानंत या आठवड्यातही रोहितने आपले स्थान कायम राखले आहे.

या यादीतील टॉपच्या चार फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चौथ्या क्रमांकावर भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल असून त्याचे ७४५ गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहली दोन वनडे सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर मग तिसऱ्या सामन्यात त्याने ७४ धावा काढल्या होत्या. परंतु त्याच्या खेळीमुळे त्याला या रँकिंगमध्ये फायदा झालेला नाही, तर बाबर आझमच्या फ्लॉप शोमुळे विराट टॉप फाईव्हमध्ये पोहचला आहे.

Rohit Sharma retains the No.1 spot in ICC ODI Rankings 2025 as four Indian batsmen feature in the Top 10 list.
Bihar Election 2025 EXIT POLL : बिहारमध्ये मतदान संपताच ‘EXIT POLL’चे निकाल जाहीर; जाणून घ्या, ‘एक्झिट पोल’नुसार कुणाची येणार सत्ता?

मागील महिन्यात बाबर आझमने तीन एकदिवसीय सामने खेळले होते. सहा आणि आठ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात बाबर आझम क्रमशा ११ आणि २७ धावा काढून बाद झाला होता. तर ११ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरोधातील वनेड सामन्यात तो केवळ २९ धावा काढू शकला होता. त्याच्या याच फ्लॉप शोमुळे तो आता टॉप फाईव्हच्या बाहेर गेला असून, पाचव्या स्थानावरून घसून सातव्या स्थानावर पोहचला आहे.

Rohit Sharma retains the No.1 spot in ICC ODI Rankings 2025 as four Indian batsmen feature in the Top 10 list.
Shaheen Shaheed Arrest : दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत नवीन खुलासा; मसूद अझहरच्या बहिणीच्या संपर्कात होती ‘शाहीन’

आयसीसी रँकिंगमधील टॉप-10 वनडे बॅट्समन -

रोहित शर्मा (भारत)- 781

इब्राहिम जादरान (अफगानिस्तान)- 764

डेरियल मिशेल (न्यूझिलँड)- 746

शुभमन गिल (भारत)- 745

विराट कोहली (भारत)- 725

चरिथ असलंका (श्रीलंका)- 710

बाबर आजम (पाकिस्तान)- 709

हॅरी टेक्टर (आयरलँड)- 708

श्रेयस अय्यर (भारत)- 700

शाई होप (वेस्टइंडीज)- 690

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com