INDvsAUS : 'बुमरासारखी बॉलिंग करतो, मग दे पुरावा'; ICCचं ट्विट व्हायरल!

टीम ई-सकाळ
Sunday, 19 January 2020

स्टेडियममधीलच नव्हे, तर जगभरातील अनेक प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक क्रिकेटवेडे काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात.​

बंगळूर : येथील एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि खेळाला सुरवात झाली. त्यावेळी स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी हजारो क्रिकेट फॅन्स उपस्थित होते. यापैकी एका क्रिकेट फॅनने टिव्हीवर सामना पाहणाऱ्यांचेच नव्हे, तर चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) लक्ष्य वेधून घेतले आहे. 

- क्रिकेटच्या देवाने 'त्या' क्रिकेट फॅनला दिले 'स्पेशल' गिफ्ट!

त्याचे झाले असे की, सामना पाहण्यासाठी आलेल्या या फॅनने आपल्या हातातील एका पोस्टरवर लिहलेला मजकूर तितकाच मजेशीर होता. याची दखल आयसीसीने घेतली. 'मी बुमरासारखी बॉलिंग करू शकतो' अशी टॅगलाईन त्या पोस्टरवर लिहली होती. 

स्टेडियममधीलच नव्हे, तर जगभरातील अनेक प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक क्रिकेटवेडे काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. कुणी रंगरंगोटी करतो, तर कुणी आपल्या आवडत्या क्रिकेटरचा पोस्टर घेऊन स्टेडियममध्ये आलेला असतो. 

- धोनीला करारातून वगळण्याबाबत दादाचे 'नो कमेंट्स प्लीज'!

आज मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या या फॅनची दखल खुद्द आयसीसीला घ्यावी लागली. तेव्हा आयसीसीनेही या फॅनकडे एक प्रश्न उपस्थित केला आहे. ''जर तू जसप्रित बुमरा सारखी बॉलिंग करत असशील, तर आम्हाला त्याचा व्हिडिओ पुरावा हवा आहे."  

- INDvsAUS : स्मिथच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला तारले; भारतापुढे 287 धावांचे आव्हान

हा फोटो आयसीसीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला असून त्याच्यावर अनेक नेटकऱ्यांनी लाईक ठोकत कमेंटही केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC trolls Indian fan claiming to be just as good as Jasprit Bumrah