Shardul Thakur: बागी शार्दुल ठाकूर! वादग्रस्त ट्वीट लाईक करत BCCI विरुद्ध उपसली तलवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur likes controversial tweets

Shardul Thakur: बागी शार्दुल ठाकूर! वादग्रस्त ट्वीट लाईक करत BCCI विरुद्ध उपसली तलवार

Shardul Thakur : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला जात आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर अडचणीत सापडला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाल्यानंतर त्याने 3 वादग्रस्त ट्विट लाइक केले. खरं तर बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड झाली नव्हती. यानंतर शार्दुलने असे ट्विट लाईक केले ज्यामध्ये निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहे.

हेही वाचा: KL Rahul : बाशिंग बांधण्यापूर्वी kl राहुलची उडणार दांडी ?

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली. दुसऱ्या कसोटीतही भारताने बांगलादेशच्या पहिल्या डावात केलेल्या 227 धावांच्या प्रत्युत्तरात 314 धावा केल्या आणि पहिल्या डावात आघाडी घेतली. बांगलादेशच्या खेळपट्टीने आतापर्यंत फिरकीपटूंना खूप मदत केली आहे.

हेही वाचा: IND vs BAN : ऋषभ पंतने घेतली झोपेची गोळी? माजी दिग्गज खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य

कुलदीप यादवने पहिल्या कसोटीत 8 विकेट घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला बेंचवर बसवण्यात आले. त्याच्या जागी जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली. पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या कुलदीपला वगळण्यावरही चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान शार्दूलही संघात निवड न झाल्याने निराश दिसला. एका चाहत्याच्या वादग्रस्त ट्विटला लाईक करून त्याने बंडखोर वृत्ती दाखवली.

हेही वाचा: IND vs BAN: कोहलीसाठी अत्यंत वाईट दिवस! आधी सोडले चार झेल नंतर केली शिवीगाळ...

शार्दुलला आवडलेल्या ट्विटमध्ये चाहत्याने त्याला रणजी खेळण्याचा सल्ला दिला. शार्दुलने बेंचवर बसण्याऐवजी रणजी खेळावे किमान त्याच्यासोबत राजकारण होणार नाही, असे या चाहत्याने म्हटले होते. याआधीही त्याने काही ट्विट लाइक केले होते, जिथे एका वापरकर्त्याने म्हटले होते की भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर ट्विटर ट्रेंडचा प्रभाव आहे.