IND vs BAN : भारताच्या आगामी सामन्यावर काळे ढग; उपांत्य फेरीचे समीकरण बिघडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs ban weather forecast

IND vs BAN : भारताच्या आगामी सामन्यावर काळे ढग; उपांत्य फेरीचे समीकरण बिघडणार

IND vs BAN Weather Forecast : टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. या टी-20 विश्वचषकातमधील भारताचा हा पहिला पराभव आहे. टेम्बा बावुमाच्या संघाने भारताचा 5 गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

हेही वाचा: T20 World Cup: टीम इंडियावर मोठं संकट, 'या' एका कारणामुळे वर्ल्ड कप मधून होऊ शकते गच्छंती

भारताचे आता ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने बाकी आहेत, भारताला उपांत्य फेरीत सहज प्रवेश करायचा असेल तर हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण हवामान पाहता भारताचा उपांत्य फेरीचा रस्ता सोपा होणार नाही असे दिसत आहे. टीम इंडियाला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये होणार आहे, या सामन्यात पावसाचे सावट आहे.

हेही वाचा: T20 World Cup: भारत हारला पण पायलटनं जिंकलं! विमानात 'मॅच'

टी-20 विश्वचषकात भारताचा सामना बुधवारी बांगलादेशशी होणार आहे. Accuweather च्या अहवालानुसार, भारताच्या सामन्याच्या दिवशी अॅडलेडमध्ये पावसाची 60% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असणार आहे. त्याच वेळी World weather online च्या अहवालानुसार, संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु रात्री आणखी पाऊस पडू शकतो. स्थानिक वेळेनुसार भारताचा हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.

हेही वाचा: Hardik Pandya : T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला मिळाला नवीन 'कर्णधार'

भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे वाहून गेला तर टीम इंडियाला फक्त एक गुण मिळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारत गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला बांगलादेशविरुद्ध 1 गुण मिळाल्यास टीम इंडियाचे केवळ 5 गुण होतील जे उपांत्य फेरी गाठण्यासाठी अपुरे आहे. अशा स्थितीत भारताला ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध विजयाची नोंद करावी लागेल.