INDvsENG : 'बाप-माणूस' पुन्हा खवळला; कोहलीनं 'इज्जत'मध्ये पंचाशी घातली 'हुज्जत'

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 15 February 2021

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर उतरल्यानंतर पुन्हा त्याचे 'पुराने तेवर' पाहायला मिळाले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यात खूपच शांत आणि कूल दिसला होता. पॅटर्निटी लिव्हवरुन परतल्यानंतर विराटमध्ये बदल झालाय. असा अंदाजही काहींनी लावला असेल. पण दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर उतरल्यानंतर पुन्हा त्याचे 'पुराने तेवर' पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांना शिळ घालून शिट्टी आणि टाळ्या वाजवायला सांगणारा विराट तिसऱ्या दिवशी पंचावर खवळल्याचे दिसले.

आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने अश्विनच्या साथीनं डावाला आकार दिला. दोघांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला. पण पळून धाव काढत असताना विराट डेंजर झोन वरुन धावताना कॅच झाला. अंपायर मेनन यांनी त्याला वॉर्निंग दिली. आणि विराटमधील आक्रमकता जागी झाली. विराटने यावर नाराजी व्यक्त केली. हावभाव दाखवून गप्प बसेल तो विराट कसला? त्याने थेट पंचासोबत हुज्जत घालताना दिसून आले.  

INDvENG : अश्विननं चौकार मारला आणि सिराजचा आनंद गगनाला भिडला (VIDEO)

नेमक काय घडलं

उपहारापूर्वी इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं चेंडू लॉरेन्सच्या हाती सोपवला. चौथ्या चेंडूवर अश्विने फटका मारला. यावेळी तीन धावा घेताना विराट कोहली लेग साइडच्या दिशेने ऑफ साइडला पळताना दिसले. डेंजर झोनमधून धावल्याने मैदानावरील पंचांनी त्याला समज दिली. धाव पूर्ण झाल्यानंतर मेनन यांनी विराटला ताकीद दिली. विराटने पंचाशी हुज्जत घातली. त्यानंतर क्रिजमध्ये पोहचल्यावर तो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रुटलाही काहीतरी म्हटला. त्यानंतर विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले. कोहली या सामन्यात शतकाचा दुष्काळ संपवेल, असे वाटत असताना मोईन अलीने त्याला 62 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.  

INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.अश्विनचे शतक आणि कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 286 धावा करुन पाहुण्या इंग्लंडसमोर 482 धावांचे मोठे टार्गेट ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसऱ्या डावालाही भारतीय फिरकीने सुरुंग लावलाय. 53 धावांवर त्यांचे तीन गडी तंबूत परतले आहेत. कसोटी वाचवणे त्यांच्यासाठी मुश्किलच दिसते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ind vs eng virat kohli angry on umpire nitin menon warns running on danger area pitch