इंग्लंडच्या खेळाडूचं स्पष्टीकरण, 'कोहलीला डिनरला बोलवलं नाही म्हणून...'

विराट कोहलीला डिनरसाठी बोलावले नव्हते, त्यामुळे राग आला
Virat Kohli vs Jonny Bairstow
Virat Kohli vs Jonny Bairstowsakal
Updated on

Virat Kohli vs Jonny Bairstow: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. सोशल मीडियावर दोघांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. इतकेच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू सेहवागने कोहलीवर टीका केली. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लिश खेळाडू बेअरस्टोने या भांडणाचा खुलासा केला आहे. भांडणाचा खुलासा करताना बेअरस्टो म्हणाला, कोहलीला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले नाही, त्यामुळे तो माझ्या वर रागावला आहे.

Virat Kohli vs Jonny Bairstow
'छमिया नाच रे' सेहवागची विराट डान्स वर पातळी सोडून कमेंट- VIDEO

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स क्रीजवर आले. खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली बेअरस्टोला काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टोने विराट कोहलीला प्रत्युत्तर दित त्यावर या दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. विराट कोहली म्हणाला, मला काय करायचं आहे ते सांगू नकोस, तोंड बंद करून बॅटिंग कर.

Virat Kohli vs Jonny Bairstow
IND vs ENG : बेअरस्टोची शतकी झुंज!

कोहली आणि बेअरस्टो यांच्यातील जोरदार वाद मिटवण्यासाठी पंचांनाही हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पंचांनी कोहली आणि बेअरस्टो यांना शांतता राखण्यास सांगितले. त्यानंतर वातावरण थोडे शांत झाले. या प्रकरणाबाबत बोलताना बेअरस्टो म्हणाला, आमच्यात असं काही घडल नाही. आम्ही दोघे जवळपास 10 वर्षांपासून एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. कोहलीला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले नाही, त्यामुळे तो माझ्या वर रागावला आहे.

Virat Kohli vs Jonny Bairstow
'तोंड बंद करून गपगुमान बॅटिंग कर'....भर मैदानात जॉनी बेयरस्टोशी भिडला विराट

बेअरस्टोच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडला 284 धावा करता आल्या. भारताने पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतली होती. त्याचवेळी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 125 धावा केल्या. क्रीजवर पुजारा 50 आणि पंत 30 धावांवर खेळत आहे. भारताकडे आता 257 धावांची आघाडी आहे. भारतीय संघ हा कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर मालिकेवर कब्जा केला जाईल. सध्या या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Shivaji Maharaj State Volleyball Tournament
Lionel Messi
Thailand Open
Sports News
Marathi News Esakal
www.esakal.com