WI vs IND : रोहित - कार्तिकने रचला पाया, त्यावर रविचंद्रन - रवीने चढवला कळस

India Defeat West Indies In 1st T20I Rohit Sharma Dinesh Karthik R Ashwin Ravi Bishnoi Shine
India Defeat West Indies In 1st T20I Rohit Sharma Dinesh Karthik R Ashwin Ravi Bishnoi Shine esakal

India Defeat West Indies : भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या टी 20 सामन्यात 68 धावांनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 64 तर दिनेश कार्तिकने नाबाद 41 धावा करत भारताला 190 धावा उभारून दिल्या. त्यानंतर अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेत विंडीजला 20 षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 122 धावात रोखले. (Rohit Sharma Dinesh Karthik R Ashwin Ravi Bishnoi Shine)

India Defeat West Indies In 1st T20I Rohit Sharma Dinesh Karthik R Ashwin Ravi Bishnoi Shine
Commonwealth Games 2022 Day 1 : पहिल्याच दिवशी भारताने पाकिस्तानचा केला दोनदा पराभव

भारताने ठेवलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरूवात खराब झाली. भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने वेस्ट इंडीजला धक्के दिले. सुरूवातीला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, त्यानंतर रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार यांनी वेस्ट इंडीजची टॉप ऑर्डर उडवली.

त्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोईने वेस्ट इंडीजच्या मधल्या फळीला स्थिरावण्याची संधी दिली नाही. वेस्ट इंडीजचे फलंदाज 15 - 20 धावा करून पॅव्हेलियनची वाट धरू लागले. त्यामुळे विंडीजची अवस्था 5 बाद अशी झाली होती. त्यानंतर अश्विनने हेटमायरला 14 तर रवी बिश्नोईने ओडिन स्मिथला शुन्यावर बाद करत विंडीजची अवस्था 7 बाद 86 अशी केली.

यानंतर विंडीजचा संघ सावरू शकला नाही. अखेर त्यांचा डाव 20 षटकात 8 बाद 122 धावात संपुष्टात आला. अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

India Defeat West Indies In 1st T20I Rohit Sharma Dinesh Karthik R Ashwin Ravi Bishnoi Shine
Rohit Sharma : अर्धशतक ठोकत रोहितने केले वर्ल्ड रेकॉर्ड

तत्पूर्वी, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सूर्यकुमार यादवला सलामीला पाठवत एक प्रयोग केला. मात्र हा प्रयोग फसला. 24 धावांची भर घालून माघारी परतला.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत भारताचा डाव एकहाती सावरला. दुसऱ्या बाजूने भारतीय मधल्या फळीतील फलंदाज एका पाठोपाठ एक मघारी जात होते. श्रेयस अय्यर (०), ऋषभ पंत (14), हार्दिक पांड्या (1) धाव करून बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माने 44 चेंडूत 64 धावांची खेळी केली.

मात्र मोक्याच्या क्षणी रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर शेवटच्या पाच षटकात दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांनी 4 षटकात 52 धावांची भागीदारी रचली. दिनेश कार्तिकने 19 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या तर अश्विनने 10 चेंडूत 13 धावांचे योगदान दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com