U19CWC Final : बांगलाच्या माऱ्यापुढे टीम इंडियाचे लोटांगण; 178 रन्सचे माफक आव्हान!

U19-Team-Bangladesh
U19-Team-Bangladesh

INDvsBAN : पोचेस्ट्रूम : येथे भारत-बांगलादेश या संघांमध्ये अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची फायनल मॅच खेळली जात आहे. गतविजेता आणि यंदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाने बांगलादेशी माऱ्यापुढे लोटांगण घातले. 

अनेक अडथळे पार करत इथपर्यंत पोहोचलेल्या बांगलादेशी खेळाडूंनी वर्ल्डकपची फायनल रंगतदार बनवली. नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय बांगलादेशचा कॅप्टन अकबर अलीने घेतला. त्याचा हा निर्णय बॉलरनी सार्थ ठरवत भारताला 177 धावांत गुंडाळले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताच्या डावास आकार देण्याचा प्रयत्न केला. 

बांगलादेशी खेळाडूंनी केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे टीम इंडियाचा निभाव लागला नाही. सुरवातीपासूनच संथ धावगती असल्यामुळे मोठे आव्हान उभारण्याची शक्यता कमी झाली होती. बॉलिंग आणि फिल्डींगमध्ये जोरदार कामगिरी बजावत बांगलाने टीम इंडियाला जखडून ठेवले होते. जैस्वाल, वर्मा आणि जुरेल या तिघांव्यतिरिक्त इतर भारतीय खेळाडूं दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. 

दरम्यान, यशस्वी जैस्वालने 121 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या बळावर 88 रन्सची अर्धशतकी खेळी केली. त्याला तिलक वर्माने (38) चांगली साथ दिली. वर्मा आणि जैस्वाल माघारी परतल्यानंतर जुरेलने 22 रन्स काढत स्कोअर बोर्ड हलता ठेवला होता. मात्र, तिलक आणि जुरेलला मोठी खेळी करता आली नाही. 

बांगलादेशने हसन मुरादच्या जागी अविषेक दासला संधी दिली. या संधीचे सोने करत दासने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच शोरिफूल इस्लाम आणि तंझीम सकीब यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या तर रकीबूल हसन यांने 1 विकेट घेतली.  

संक्षिप्त धावफलक :
भारत : 47.2 ओव्हरमध्ये सर्वबाद 177
यशस्वी जैस्वाल 88 (8 फोर, 1 सिक्स), तिलक वर्मा 38 (3 फोर), जुरेल 22 (1 फोर); अविषेक दास 40-3, शोरिफूल इस्लाम 31-2, तंझीम सकीब 28-2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com