esakal | ICC T20 World Cup : श्रेयस अय्यरवर 'स्टँडबाय'ची वेळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer

ICC T20 World Cup : श्रेयस अय्यरवर स्टँडबायची वेळ कुणामुळे?

sakal_logo
By
सुशांत जाधव

आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडच्या मैदानात मर्यादित षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) स्डँडबाय खेळाडू होण्याची वेळ आली आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जो संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यात लोकेश राहुलला (KL Rahul) फलंदाजीच्या कोट्यातून संघात स्थान देण्यात आले असून रिषभ पंतच्या (Rishabh Pant) साथीला दुसरा यष्टीरक्षक म्हणून युवा फलंदाज यष्टीरक्षक ईशान किशनला (Ishan Kishan) पसंती मिळाली आहे.

आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची दरवाजे खुली झालेल्या सूर्यकुमार यादवला मध्यफळीत स्थान देण्यात आले आहे. 4 टी-20 मध्ये 139 धावा करणाऱ्या सूर्याची 57 ही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. धवनच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेत झालेल्या वनडे आणि टी-20 संघाचाही तो भाग होता. लोकेश राहुलला फलंदाजीच्या कोट्यातून स्थान देत ईशान किशनचे दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या रुपात संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळेच श्रेयस अय्यरचे नाव स्टँडबायच्या यादीत गेल्याचे दिसते. त्याच्यासोबतच शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर या दोघही स्टँडबाय खेळाडूंमध्ये आहेत.

हेही वाचा: ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

दुसरीकडे श्रेयस अय्यर घरच्या मैदानात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत खेळताना पाहायला मिळाले होते. या सामन्यात पहिल्या सामन्यातील 67 धावांच्या खेळीशिवाय चौथ्या डावात केलेल्या 37 धावा केल्या होत्या. दोन सामन्यात त्याला दुहेरी आकडाही पार करता आला नव्हता. याच दौऱ्यावर खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

हेही वाचा: T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

17 आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. दोन गटात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघ दुसऱ्या गटात आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून या दोन्ही संघाशिवाय न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांचाही या गटात समावेश आहे. पहिल्या गटात गत वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.

loading image
go to top