IND vs BAN : भारत-बांगलादेश सामना HotStar वर नाही! मग कुठे पाहणार... तो पण 'फ्री' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs bangladesh 1st odi live streaming

IND vs BAN : भारत-बांगलादेश सामना HotStar वर नाही! मग कुठे पाहणार... तो पण 'फ्री'

India vs Bangladesh 1st ODI Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ आगामी बांगलादेश दौऱ्यावर यजमान संघासोबत 3 वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 4 डिसेंबरला एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचे सर्व मोठे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित केले जात असल्याचे आपल्याला दिसून येते. अलीकडेच भारत आणि न्यूझीलंड मालिकेचे थेट प्रक्षेपण Amazon प्राइम व्हिडीओवर झाले परंतु भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यांचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर केल्या जाणार हे तुम्हाला माहिती आहे का?

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केल्या जाणार आहे. जर सामना तुम्हाला फ्री पाहायचा आहे तर DD स्पोर्टवर पाहता येईल. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे बांगलादेश दौऱ्यावर परतत आहेत, ज्यांना न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती.

एकदिवसीय मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक

  • पहिला सामना : 4 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता - शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाक

  • दुसरा सामना : 7 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता - शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका

  • तिसरा सामना : 10 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, यश दयाल.