IND vs ENG : अॅडलेडची हवा भारतालाच मानवते! या 5 कारणांमुळे भारताचे पारडे आहे जड

India Vs England Semi Final T20 World Cup 2022
India Vs England Semi Final T20 World Cup 2022esakal

India Vs England Semi Final T20 World Cup 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनल होत आहे. भारताने सुपर 12 फेरीत ग्रुप 2 मध्ये 8 गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. तर इंग्लंड ग्रुप 1 मध्ये दुसऱ्या स्थानावर होती. आज अॅडलेडवर हे दोघेही फायनल गाठण्यासाठी भिडणार आहेत. वरवर बघायला गेलं तर दोन्ही संघ बलाढ्य आणि तुल्यबळ दिसतात. मात्र आजच्या सामन्यात भारताचे पारडे पाच कारणांनी जड आहे.

India Vs England Semi Final T20 World Cup 2022
IND vs ENG : भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसाने वाहून गेली तर... नियम काय सांगतो भाऊ?

1 - टी 20 वर्ल्डकपमधील भारताचा इंग्लंडविरूद्धचा इतिहास हा भारताच्या बाजूने आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये 3 सामने झाले आहेत. त्यातील भारताने 2 तर इंग्लंडने एका सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने 2007 आणि 2012 मध्ये इंग्लंडला मात दिली होती. तर 2009 मध्ये इंग्लंडने भारताला मात दिली होती. त्यावेळी इंग्लंडने भारताला सेमी फायनल खेळण्यापासून रोखले होते.

2 - यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पहिल्या 10 सर्वोच्च धावसंख्येमध्ये भारताच्या 3 धावसंख्येचा समावेश आहे. भारताने 186, 184 आणि 179 धावा उभारल्या आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडची179 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेने 205 धावा करत या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

3 - अॅडलेडची हवा ही इंग्लंडच्या नाही तर भारताच्या बाजूने वाहते. कारण इंग्लंडला या मैदानावर फक्त 1 सामना जिंकता आला होता. तोही 9 वर्षापूर्वी त्यांनी 2011 मध्ये जिंकला होता. भारताने आपल्या दोन्ही टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वर्चस्व गाजवले आहे. तर या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशलाही पराभूत केलं आहे. तर 2016 ला यजमान ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला होता.

India Vs England Semi Final T20 World Cup 2022
Gujarat Assembly Election 2022: : जडेजाची बायको गुजरात विधानसभा लढवणार; तिकीट झाले पक्के

4 - अॅडलेड किंग कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 5 सामन्यात 123 च्या सरासरीने 246 धावा कुटल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने 225 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 194 इतका आहे. या दोन्ही बाबतीत इंग्लंडच्या फलंदाजांकडे दुष्काळ दिसतोय. इंग्लंडकडून जॉस बटलरने सर्वाधिक 119 धावा केल्या आहेत.

5 - इंग्लंडला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. सेमी फायनलपूर्वी त्यांचा वेगवान गोलदाज मार्क वूड दुखापतग्रस्त झाला. तो सेमी फायनल खेळणार नाही. तर डेव्हिड मलान देखील सामन्याला जवळपास मुकणार हे निश्चित आहे.

भारतीय संघात सुधारणेला अजून वाव

भारतीय संघाचे जसे प्लस पॉईंट आहेत तशा काही त्रुटी देखील आहेत. गेल्या वर्षी भारतीय संघाला टी 20 वर्ल्डकमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. भारत 2013 नंतर बाद फेरीचा अडथळा पार करू शकलेला नाही. 2014 ला फायनल आणि 2016 ला सेमी फायनलमध्ये भारत पराभूत झाला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताची रन मशीन विराट कोहली इंग्लंडचा फिरकीपटू राशिदविरूद्ध 59 चेंडूत फक्त 63 धावाच करू शकला आहे. तो राशिदला 2 वेळा बाद देखील झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com