Wasim Akram IND vs ENG : भारताचा हा गोलंदाज माझ्यापेक्षाही भारी; वसिम अक्रमने कोणाची पाठ थोपटली?

Wasim Akram Jasprit bumrah
Wasim Akram Jasprit bumrahesakal

Wasim Akram IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडच्या तगड्या फलंदाजीला 129 धावात गुंडाळात 230 धावांचे छोटे आव्हान देखील सहजरित्या डिफेंड केले. भारताकडून मोहम्मद शामीने 4 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या या दमदार कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज वसिम अक्रम जाम खूश झाला आहे. विशेषकरून अक्रमने जसप्रीत बुमराहचे तोंडभरून कौतुक केले. हे कौतुक करतानाच त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना देखील बुमराहकडून काहीतरी शिकण्याची सल्ला दिला.

Wasim Akram Jasprit bumrah
World Cup 2023 Semi Final Scenario : भारताशिवाय 'या' संघाची जागा निश्चित! सेमी फायनलसाठी २ जागेसाठी ६ संघामध्ये चुरशीची लढत

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पाठोपाठ दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे माजी विजेते चांगलेच दबावात आले. बुमराहवर खूश झालेल्या वसिम अक्रम स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'तो जगात सध्या सर्वोत्तम आहे. त्याच्याकडे नियंत्रण वेग, विविधता आहे. तो संपूर्ण गोलंदाज आहे. त्याला पाहणे पर्वणीच असते.'

तो पुढे म्हणाला, 'नवीन चेंडूवर या खेळपट्टीवर अशा प्रकारची मुव्हमेंट, वेग, कॅरी, फॉलो थ्रो तुम्ही त्याला संपूर्ण गोलंदाज म्हणू शकता.'

अक्रमने बुमराहला त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज म्हणत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अक्रमच्या मते भारताच्या या गोलंदाजाकडे सर्वात चांगले नियंत्रण आहे.

'ज्यावेळी जसप्रीत बुमराह डावखुऱ्या फलंदाजाला राऊंड द विकेट गोलंदाजी करतो आणि चेंडू सीमवर हिट करतो. तो क्रीजच्या कोपऱ्यातून गोलंदाजी करतो त्यामुळे फलंदाजाला वाटते की चेंडू आत येणार मात्र तो बाहेर जातो.'

'तो अँगलने गोलंदाजी करतो मात्र चेंडू खेळपट्टीवर आदाळल्यानंतर तो फलंदाजापासून दूर जातो. फलंदाज इथेच फसतो.'

Wasim Akram Jasprit bumrah
Hardik Pandya : हार्दिकही संघात होणार दाखल, सूर्याचीही 49 धावांची खेळी; प्लेईंग 11 मध्ये कोणाची प्रबळ दावेदारी?

अक्रमने पाकिस्तानी गोलंदाजांना सल्ला दिला. तो म्हणाला, 'पाकिस्तानी गोलंदाजांपेक्षा बुमराह जास्त घातक का आहे. कारण तो जास्त कसोटी क्रिकेट खेळतो. आमचे गोलंदाज कसोटी क्रिकेट जास्त खेळत नाहीत.'

बुमराहच्या गोलंदाजीचा मोहम्मद शमीला देखील फायदा झाला. त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. भारताने छोट्या टार्गेटचा बचाव केला अन् इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com