INDvsNZ:एकादिवसात पडल्या 16 विकेट्स; भारत मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर

टीम ई-सकाळ
Sunday, 1 March 2020

ख्राईस्टचर्च : अनिश्चिततेचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेटचा आज, भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात प्रत्यय आला. दिवसाच्या सुरुवातील बॅकफूटवर असलेल्या भारताला गोलंदांजांनी आघाडी मिळवून दिली. तर त्याच टीमच्या फलंदाजांनी मात खात, पुन्हा संघाला पराभवाच्या खाईत लोटून दिलं. कसोटी सामन्याच्या एका दिवसात 16 विकेट्स पडण्याची ही काहीशी दुर्मिळ घटना आहे. पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्लेला भारतीय संघ, आता दुसऱ्या कसोटी तिसऱ्याच दिवशी पराभूत होण्याची शक्यता आहे. 

ख्राईस्टचर्च : अनिश्चिततेचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेटचा आज, भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात प्रत्यय आला. दिवसाच्या सुरुवातील बॅकफूटवर असलेल्या भारताला गोलंदांजांनी आघाडी मिळवून दिली. तर त्याच टीमच्या फलंदाजांनी मात खात, पुन्हा संघाला पराभवाच्या खाईत लोटून दिलं. कसोटी सामन्याच्या एका दिवसात 16 विकेट्स पडण्याची ही काहीशी दुर्मिळ घटना आहे. पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्लेला भारतीय संघ, आता दुसऱ्या कसोटी तिसऱ्याच दिवशी पराभूत होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढं नांगी टाकली होती. काईल जेमिसनचने पाच विकेट्स घेऊन टीम इंडियाला खिंडार पाडलं होतं. त्यामुळं भारताचा डाव पहिल्याच दिवशी 242 वर संपुष्टात आला होता. भारताकडून पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतकं ठोकली होती. पण, आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. मोहम्मद शमीने चार विकेट्स घेऊन आपली भूमिका पार पाडली. इशांत शर्मा जखमी झाल्यामुळं संधी मिळालेल्या उमेश यादवला केवळ एका विकेटवर समाधान मानावं लागलं. जसप्रीत बुमराहनं तीन तर, जडेजानं दोन विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यामुळं न्यूझीलंडचा डाव 235 वर आटोपला. भारताला सात रन्सची माफक आघाडी मिळाली. पण, टीमला त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 

आणखी वाचा - गुड न्यूज, घरगुती सिलिंडरच्या दरात कपात 

दुसऱ्या डावात पडझड
दुसऱ्या डावात भारताची सुरुवातच अतिशय निराशाजनक झाली. मयांक अगरवाल (3 रन्स) पुन्हा अपयशी ठरला. पृथ्वी शॉ, पुजारा यांनी मोठी पार्टनरशीप करण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही अपयशीच ठरले. पाठोपाठ विराट आणि अजिंक्य राहणे यांनाही फार काळ तग धरता आला नाही. टीमचा स्कोअर 5 आऊट 84 असा निराशाजनक होता. त्यावेळी नाईट वॉचमन म्हणून, उमेश यादवला पाठवण्यात आलं. पण, तोही आऊट झाला. अखेर रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी टीमची आणखी पडझड होऊ दिली नाही. आता उ्द्या हे दोघे किती मोठी पार्टनरशीप करतात. त्यांच्यानंतर रवींद्र जडेजा किती फटकेबाजी करतो यावर भारताची दुसऱ्या डावातील धावसंख्या अवलंबून आहे. भारता न्यूझीलंडला किती टार्गेट देणार आणि भारताचे गोलंदाज कसा मार करतात, यावर भारताचं भवितव्य अवंबून आहे. 

आणखी वाचा - भारतात येऊ द्या कोरोना; अभिनेत्याची देवाकडे प्रार्थना

विराट पुन्हा अपयशी 
धावांचा पाठलाग करताना आणि कसोटीच्या दुसऱ्या डावात कायम चांगली खेळी करणारा भरवशाचा कर्णधार विराट कोहली याही डावात अपयशी ठरला. त्याला केवळ 14 रन्स करता आल्या. विराट कोहलीसाठी न्यूझीलंडचा हा दौरा साफ अपयशी ठरला आहे. एकाही फॉर्मेटमध्ये त्याला लधवेधी खेळी करता आलेली नाही. विशेषतः कसोटीमध्ये टीमचं नाक कापण्याची वेळ आली तरी, विराटला आपल्या खेळीनं पराभवाची नामुष्की टाळता आली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs new zealand second test second day world test championship India lead 97 runs