
पाक क्रिकेटर पडला मागे; आता वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे
IND vs SL 3rd T20I: भारतीय संघाने घरच्या मैदानावर रंगलेल्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचाही धुव्वा उडवला. याआधीर रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज संघाची जी अवस्था केली तिच परिस्थिती श्रीलंकेवरही ओढावली. भारतीय संघाकडून (Team India) श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) मालिका गाजवली. तिन्ही सामन्यात त्याने नाबाद अर्धशतक झळकावून टीम इंडियातील आपली दावेदारी भक्कम केलीये. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दुसऱ्या सामन्यात तो एका धावेवर बाद झाला तर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याला 5 धावांवर तंबुचा रस्ता धरावा लागला.
मालिकेत वैयक्तिक धावांची बरसात करण्यात तो थोडा कमी पडला असला तरी नेतृत्वाशिवाय आणखी एक कर्तृत्ववान कामगिरी त्याने करुन दाखवलीये. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्माच्या नावे खास विश्व विक्रमाची नोंद झाली. (Rohit Sharma World Record) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकचा (Shoaib Malik) विक्रम मोडित काढत जगात भारी ठरलाय.
हेही वाचा: श्रेयस अय्यरचा 'द्विशतकी' धमाका; किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावे केला. याआधी शोएब मलिकने टी 20 मध्ये 124 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले होते. रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध 125 सानना खेळला. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद हाफिझ 119 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन 115 ,बांगलादेशचा महमुदुल्लाह 113 सामने खेळला आहे. टी-20 मध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा शंभर सामने खेळणारा भारताचा पहिला फलंदाजही आहे.
हेही वाचा: PSL 2022 Final : दमादम मस्त 'कलंदर्स' लाहोरचा पहिला नंबर...
भारताकडून रोहित पाठोपाठ सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा विक्रम हा धोनीच्या नावे आहे. भारतीय संघाला पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीने 98 सामने खेळले आहेत. या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने 97 टी-20 सामने खेळले आहेत. सुरैश रैनाने 78 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून शिखर धवन 68 सामन्यासह पाचव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा: मॅच बघायला गेली तिथं खेळाडूंचा राडा; सारा तेंडुलकरनं शेअर केली स्टोरी
Web Title: India Vs Sl 2022 Rohit Sharma World Record Even Ms Dhoni And Virat Kohli Couldnt Achieve The Feat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..