U19 WC: भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव;BCCI ने घेतला मोठा निर्णय | U19 World Cup Indian Players Tested Corona Positive | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

U19 World Cup Indian Players Tested Corona Positive
U19 WC: भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; BCCI ने घेतला मोठा निर्णय

U19 WC: भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; BCCI ने घेतला मोठा निर्णय

वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकप (U19 World Cup) सुरू आहे. भारताने (Team India) ग्रुपमधील आपले दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपची धाडक्यात सुरुवात केली. मात्र धडाकेबाज सुरूवात करणाऱ्या भारतीय संघामध्ये कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाला आहे. भारतीय संघातील एका पाठोपाठ एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) येऊ लागल्याने बीसीसीआयने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला. (U19 World Cup Indian Players Tested Corona Positive BCCI Will Send Back Up)

हेही वाचा: #RSAvsIND: 'समालोचकांना विनंती डेथ ओव्हर म्हणू नका'

बीसीसीआयने आपले पाच राखीव खेळाडू वेस्ट इंडीजला (West Indies) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात उदय सहारन, अभिषेक पोरेल ( विकेट किपर), रिशित रेड्डी, अंश गोसाई, पीएम सिंह राठोड या खेळाडूंचा समावेश आहे. सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार या खेळाडूंना (Indian Players) त्वरित वेस्ट इंडीजला रवाना केले जाणार आहे. सूत्रांनी सांगितले की, 'बीसीसीआयने ५ खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ते सहा दिवसांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण करतील. आम्हाला आशा आहे की संघ ग्रुप बी मध्ये टॉप करेल आणि सर्व खेळाडू २९ जानेवारीला होणाऱ्या उपांत्य पूर्व सामन्यापूर्वी तंदुरूस्त आणि उपलब्ध होतील.'

हेही वाचा: हरभजन सिंग, गीता बसराला कोरोनाची लागण

भारताचा शनिवारी ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना होणार आहे. हा सामना युगांडा बरोबर होईल. भारत आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार यश धूल (Indian Captain Yash Dhul) आणि उपकर्णधार एस के राशीद कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती बीसीसीआयला देण्यात आली होती. त्यानंतर अजून दोन खेळाडूंना लक्षणे दिसत आहेत त्यामुळे त्यांची आरटी - पीसीआर (RT-PCR) चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताचे सहा खेळाडू विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भारताने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात निशांत सिंधूच्या नेतृत्वाखाली राखवी फळी मैदानात उतरवली होती. या सामन्यात भारताने आयर्लंडचा १७४ धावांनी पराभव केला होता.

Web Title: U19 World Cup Indian Players Tested Corona Positive Bcci Will Send Back Up

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..