Ind vs Sa : आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक? उपांत्य फेरी निश्चित करण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs south africa match

Ind vs Sa : आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक? उपांत्य फेरी निश्चित करण्याची संधी

India vs South Africa T20 World Cup 2022 : पाकिस्तान आणि नेदरलँडचा पराभव करून टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या मोहीमेची जोमात सुरूवात करणाऱ्या भारतासमोर आज तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. ही लढत जिंकून उपांत्य फेरी जवळपास निश्चित करण्याची नामी संधी भारताला पिळणार आहे. काही दिवसांपूर्वी हेच दोन संघ एकमेकांना भारतात भिडले होते, पण दोन देशातील लढती आणि वर्ल्डकपमधील लढत यात खूप फरक असतो हे खेळाडूंच्या घनघोर तयारीवरून समजते आहे. पर्थच्या तेज खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या दमदार वेगवान माऱ्याला भारतातील फलंदाज कसे उत्तर देतात हा औत्सुक्याचा विषय झाला आहे.

हेही वाचा: Australia Weather : ऑस्ट्रेलियातील T20 वर्ल्डकप पाण्यात; इनडोअर स्टेडियमचं घोडं कुठं अडलं?

कागदावर मांडायला गेले तर दक्षिण आफ्रिकेचा संघ परिपूर्ण असल्याचे जाणवते. दक्षिण आफ्रिकन संघात क्विंटन डिकॉक, रायली रॉसो आणि डेव्हिड मिलर यांसारखे दर्जेदार डावखुरे फलंदाज आहेत. वेगवान गोलंदाजांच्यात कागिसो रबाडा आणि एत्रिक नॉर्किया यांसारखे अत्यंत वेगवान आणि दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खेळपट्टी मायदेशाच्या जवळ जाणाऱ्या आहेत. भारतात खेळून आल्याने आम्हाला सामन्याच्या सरावाची तयारी आहे. संघ चांगल्या लयीत आहे. सर्व खेळाडू एकदिलाने सर्वोत्तम कामगिरी करायला उत्सुक आहेत. आमच्या गोलंदाजीत धार आणि विविधता असल्याने भारतीय संघाला आव्हान द्यायला आम्ही सज्ज झालो आहोत, या शब्दांत नॉर्कियाने भावना मांडल्या.

हेही वाचा: BWF French Open : सात्विक - चिराग जोडीने मारली अंतिम फेरीत धडक

दुसऱ्या बाजूला भारताची बाजू मांडायला फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड आले होते. स्पर्धेअगोदर भारतीय संघाने पर्थला सराव शिविर केले, त्याच्यामागे उद्देश हाच होता की या स्पर्धेत आपल्या गटात सर्वात महत्त्वाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल आणि त्याची तयारी योग्य झाली आहे. संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि खेळायला उत्सुक आहेत. के एल राहुलला दोन सामन्यात अपयश आले हे खरे असले तरी लगेच त्याची जागा दुसऱ्या देण्याची शक्यता कमी आहे. राठोड म्हणाले,

हेही वाचा: MS Dhoni IND Vs RSA : आफ्रिकेविरूद्ध धावांचा पाऊस! धोनीनं पांड्या - पंतला दिली खास टिप्स

नको नको रे पावसा

चालू स्पर्धेत पावसाने घातलेल्या धिंगाण्याने संयोजक हैराण झाले आहेत, खेळाडू नाराज झाले आहेत आणि चाहते निराश झाले आहेत. आयसीसीने ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात इतकी मोठी स्पर्धा भरवण्याचा घाट घातलाच का, असा प्रश्न विचारला जात आहे. नेहमी लख्ख उजेड असणाऱ्या पर्थ शहरातही सामन्याच्या आदल्या दिवशी एकदम थंड हवा होती आणि आकाशात सतत काळे ढग रेंगाळत होते. रविवारी पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. भारताने दोन सामने जिंकल्याने स्थानिक लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि रविवारच्या भारताच्या सामन्याला प्रेक्षागृह भरलेले असेल असे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना रोमांचकारी होईल अशी प्रेक्षकांना आशा आहे.

हेही वाचा: Virat Kohli : विराट सर्वांत परिपूर्ण भारतीय फलंदाज; ग्रेग चॅपेल

पावसाची शक्यता नाही

सामन्याच्या आदल्या दिवशी ११ जणांच्या संघातील फक्त दिनेश कार्तिक सरावाला आणि कप्तान रोहित शर्मा खेळपट्टीचा अंदाज घ्यायला मैदानावर आला होता. बाकी संघाने आराम करणे पसंत केले. सामन्याच्या दिवशी पाऊस पडणार नसल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. भारताच्या सामन्याअगोदर पाकिस्तानचा संघ नेदरलँडस् विरूद्ध सामना खेळणार असल्याने खेळपट्टीचा स्वभाव समजायला मदत होणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघात तीन दर्जेदार डावखुरे फलंदाज असल्याने आणि खेळपट्टी तेज असल्याने भारतीय संघात झाला, तर एकमेव बदल फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी हर्शल पटेल खेळविण्याचा केला जाऊ शकतो.

कुछ तो लोग कहेंगे

पाकिस्तानने झिम्बाब्वे विरूद्धचा सामना गमावला आणि माजी खेळाडूंनी संघावर हल्लाबोल केला. माजी खेळाडू टोकाची टीका करतात आणि खासगीत झालेले बोलणे उघड करतात तेव्हा वाईट वाटते, पाकिस्तानी खेळाडू खासगीत बोलताना म्हणाले कुछ तो लोग कहेंगे.. लोगोंका काम है कहना.