INDvsWI : संतापलेल्या विराटचा हल्लाबोल; भारताचा विडिंजवर विक्रमी विजय

india won first t20 match against west indies at hyderabad
india won first t20 match against west indies at hyderabad

हैदराबाद : दोनशे पलिकडचे आव्हान त्यात प्रतिस्पर्ध्यांनी केलेला चिडवण्याचा प्रयत्न यामुळे शेपटीवर पाय पडलेल्या विराट कोहलीने वेस्ट इंडीज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले 50 चेंडूत नाबाद 94 धावांची घणाघाती खेळी साकार केली त्यामुळे भारताने वेस्ट इंडीजचा सहा विकेटने पराभव केला आणि पहिला ट्‌वेन्टी-20 सामना जिंकला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विराटला खुन्नस देण्याची चुक नेहमीच प्रतिस्पर्ध्यांना महागात पडते याची माहिती असूनही वेस्ट इंडीज खेळाडूंनी संकट ओढावून घेतले. वेस्ट इंडीजचे काही गोलंदाज विकेट घेतल्यावर वेगवेगळी कृती करतात विराटने त्यांना षटकार मारल्यावर आज तशीच कृती करून उत्तर दिले यावरून त्याचा राग स्पष्ट होत होता. हा राग अर्थात त्याने बॅटमधूनही व्यक्त केला. त्यामुळे रोहित शर्मा स्वस्तःत बाद होऊनही भारताने 208 धावांचे लक्ष्य पार केले. 

कुस्तीगीर परिषदेचा आखाडाही शरद पवारांनीच जिंकला

विराटने हाती घेतली सूत्रे
रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर विराट तावातावानेच मैदानात आला तो झंझावात घेऊनच. जम बसण्यासाठी काही चेंडू घेतले पण दुसऱ्या बाजूने केएल राहूल हल्ला करत होता विराटनेचाही दाणपट्टा सुरु झाला या दोघांनी दहा षटकांत शतकी भागीदारी साकार केली. तरी आव्हान काहीसे दूर होते. बढती मिळालेल्या रिषभ पंतनेही आक्रमक फलंदाजी करून समीकरण जवळ आणले. पंतपाठोपाठ श्रेयस अय्यर बाद झाला, पण विराटने सहा चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी करून विजयावर शिक्कामोर्तब केले. 

भारतीय गोलंदाजीच्या चिंध्या
भारताच्या या अगोदरच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध सात धावात सहा विकेट अशी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या दीपक चहरने आज लेंडस सिमंसला बाद करून मागील पानावरून पुढे सुरु अशी सुरुवात केली खरी, परंतु त्यानंतर तो फारच महागडा ठरू लागला. त्याच्या दोन षटकांत तब्बल 27 धावांची वसूली एविन लुईस आणि ब्रॅंडन किंग यांनी केली. विंडीजच्या या दोघा फलंदाजांचा तडाखा इतका जबरदस्त होता की भारताच्या कोणत्याच गोलंदाजा निभाव लागत नव्हता. 

प्रामुख्याने सर्वच गोलंदाजांचा टप्पा आखूड होता त्यातच क्षेत्ररणात चुका होत होत्या. सोपे झेल सुटत होते. वॉशिंग्टन सुंदरने दोन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सीमारेषेवर एकेक झेल सोडले याचा फायदा वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी घेतला. त्यांनी पहिल्या षटकापासून दहा धावांची सरासरी कायम ठेवली होती तेव्हाच ते द्विशतकी मजल मारणार हे निश्‍चित झाले होते. संपूर्ण आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यामुळे बंगळुर संघातून वगळण्यात आलेला हेटमेर तर भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. कर्णधार किएरॉन पोलार्डनेही वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले. या दोघा फलंदाजांना युझवेंद्र चहलने एकाच षटकात आणि तेही डावाच्या 17 व्या षटकात बाद केले. त्यावेळी विंडीजची धावसंख्या 5 बाद 178 अशी होती, परंतु जेसन होल्डरने नऊ चेंडूत 24 धावांचा तडाखा दिला त्यामुळे विंडीजने 207 धावांपर्यंत मजल मारली. 

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज - 20 षटकांत 5 बाद 207 (एविन लुईस 40 -17 चेंडू, 3 चौकार, 4 षटकार, ब्रॅंडन किंग 31 -23 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, शिमरॉन हेटमेर 56 -41 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, किएरॉन पोलार्ड 37 -19 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, जेसन होल्डर नाबाद 24 -9 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, वॉशिंग्टन सुंदर 3-0-34-1, दीपक चहर 4-0-56-1, युझवेंद्र चहल 4-0-36-2).
भारत - 18.4 षटकांत 4 बाद 209 (केएल राहूल 62 -40 चेंडू, 5 चौकार, 4 षटकार, विराट कोहली नाबाद 94 -50 चेंडू, 6 चौकार, 6 षटकार रिषभ पंत 18 -9 चेंडू, 2 षटकार, केरी पिएरी 4-0-44-2)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com