Davis Cup 2024 : भारत 60 वर्षानंतर खेळला पाकिस्तानात, दिली 4 - 0 ने मात

Davis Cup 2024 : भारतीय टेनिसपटूंनी पाकिस्तानला त्यांच्याच मायदेशात केला सुपडा साफ
Davis Cup 2024
Davis Cup 2024esakal

Davis Cup 2024 : डेव्हिस कप 2024 स्पर्धा खेळण्यासाठी भारताने तब्बल 60 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा केला. हा दैरा भारतासाठी अत्यंत यशस्वी ठरला. भारताने पाकिस्तानचा 4 - 0 असा पराभव केला. आज युकी भांम्ब्री आणि साकेत मयनेनीने सहज विजय मिळवला. तर निकी पूनचाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच विजय मिळवत पाकिस्तानचा सुपडा साफ केला.

Davis Cup 2024
IND vs ENG Shubman Gill : गिलचं शतक मात्र इंग्लंडचेही कमबॅक... तिसरा दिवस रंजक, चौथा ठरणार निर्णायक

भारताने शनिवारी 2 - 0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर आज रविवारी युकी भाम्ब्री आणि मयनेनी यांनी दुहेरीच्या सामन्यात पाकिस्तानच्या मुर्तझा आणि अकील खान या जोडीचा 6-2, 7-6(5) असा पराभव करत ही आघाडी 3 - 0 अशा विजयी आघाडीत रूपांतरित केली. भारताने डेव्हिस 2024 मध्ये पुढच्या फेरीत प्रवेश केला.

पाकिस्तानने महत्वाच्या सामन्यात बरकत उल्लहला अकीलने रिप्लेस केलं. पाकिस्तानने करो या मरोच्या पुरूष दुहेरीच्या सामन्यात अनुभवी खेळाडूला संधी दिली. मात्र याचा काही फायदा झाला नाही. दुसरीकडे 28 वर्षाच्या पूनचाला चौथ्या सामन्यात मोहम्मद शोएब विरूद्ध मैदानात उतरवण्यात आलं. त्याने मोहम्मदचा 6-3, 6-4 असा पराभव केला. भारताने पाकिस्तानचा 4 -0 असा पराभव केल्यानंतर पाचवा सामना खेळवण्याची गरजच भासली नाही.

Davis Cup 2024
Ind vs Eng 2nd Test Day 3 : आक्रमक सुरूवात करणाऱ्या इंग्लंडला भारताने दिला धक्का, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 67 धावा

यंदाच्या डेव्हिस कपमध्ये भारतीय संघासमोर पाकिस्तानात खेळण्यासोबतच तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं देखील आव्हानात्मक होतं. त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा होता. त्यांच्या फिरण्यावर बंधने होती. पाकिस्तान टेनिस फेडरेशनने भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेची चांगली काळजी घेतली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com