INDvsNZ : किंग कोहलीने मोडले कॅप्टन कूलचे 'हे' दोन रेकॉर्ड्स!

टीम ई-सकाळ
Wednesday, 29 January 2020

सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्यानेच सध्या टीम इंडियाची वाटचाल सुरू आहे.

INDvsNZ : हॅमिल्टन : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने भारताचा माजी विश्वविजेता कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिटमॅन रोहित शर्मा आणि रणमशिन विराट कोहली यांनी अनेक नवे रेकॉर्ड नोंदविले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवारी (ता.29) झालेला तिसरा टी-20 सामना जेवढा रोमहर्षक होता तेवढाच तो भारताच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता. यामध्ये कॅप्टन विराट कोहली टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा कॅप्टन ठरला आहे. त्याने भारताच्याच महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आता विराट कोहली तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. 

- चहल म्हणतो, ये माही भाई की जगह है, आज भी यहाँ कोई नही बैठता

या यादीत साउथ आफ्रिकेचा कॅप्टन फाफ डू प्लेसिस पहिल्या स्थानी विराजमान असून त्याच्या नावावर 1273 धावा जमा झाल्या आहेत. तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन 1148 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. विराट 1126 धावांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने भारताचा माजी कॅप्टन धोनीला मागे टाकत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. धोनीच्या खात्यात 1112 धावा जमा आहेत. 

- INDvsNZ : 'नेव्हर गिव्ह अप'; किंग कोहलीच्या विराटसेनेनं घडवला इतिहास!

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 38 धावांची खेळी करताना टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कॅप्टनचा बहुमान पटकाविला आहे. तसेच धोनीला न्यूझीलंडमध्ये मालिका विजय साजरा करता आला नाही, तो करिष्माही कोहलीने करून दाखवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका विजय साजरा करत मालिका जिंकण्याचा दुष्काळ संपवला.

- INDvsNZ : 'हिटमॅन रोहित'चा सुपरस्ट्रोक; अशी झाली सुपर ओव्हर!

सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्यानेच सध्या टीम इंडियाची वाटचाल सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकत आपल्या नावे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian skipper Virat Kohli breaks former captain MS Dhonis records in T20I