INDvsNZ : 'हिटमॅन रोहित'चा सुपरस्ट्रोक; अशी झाली सुपर ओव्हर!

INDvsNZ_Rohit-Sharma
INDvsNZ_Rohit-Sharma

INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान झालेला तिसरा टी-20 सामना खूपच रंगतदार झाला. सुपरओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. 

भारताचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने सुपरओव्हरमध्ये किवीजच्या बॉलिंगचा खरपूस समाचार घेतला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 18 धावांचे टार्गेट शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.

अशी झाली सुपरओव्हर: 
सुपरओव्हरमध्ये पहिल्यांदा बॅटिंगसाठी न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्टील हे दोघे मैदानात उतरले. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराकडे चेंडू सोपविला. पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर विल्यमसन आणि गुप्टीलने एक-एक रन काढली.

त्यानंतरच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विल्यमसनने बुमराला षटकार आणि चौकार मारत चार चेंडूत 12 धावा वसूल केल्या. पाचव्या चेंडूवर आणखी एक धाव न्यूझीलंडच्या खात्यात जमा झाली. अखेरच्या चेंडूवर गुप्टीलने बुमराला चौकार मारत भारतापुढे विजयासाठी 18 धावांचे लक्ष्य ठेवले.  

या लक्ष्याचा सामना करण्यासाठी टीम इंडियाकडून कोण मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यूझीलंडच्या विल्यमसनने टीम साऊदीकडे चेंडू सोपविल्याने तो बॉलिंग करणार हे फिक्स झाले होते. भारताकडून रोहितच्या जोडीला कोहली येणार की केएल राहुल येणार हे जवळपास निश्चित होते आणि झालेही तसेच.

रोहितने पहिल्या चेंडूवर दोन आणि दुसऱ्या चेंडूवर एक रन काढत भारताच्या खात्यात तीन रन्सची भर टाकली. स्ट्राईकवर गेलेल्या राहुलने साउदीला चौकार मारत सामन्यात रंगत आणली. अखेरच्या तीन चेंडूवर 11 रन्सची गरज असताना राहुलला चौथ्या चेंडूवर एकच धाव काढता आली आणि भारतापुढे दोन चेंडूत 10 धावा असे टार्गेट राहिले. 

स्ट्राईकवर होता भारताचा भरवशाचा बॅट्समन रोहित शर्मा. पाचव्या चेंडूवर रोहितने साउदीला षटकार मारत सामन्याची रंगत वाढवली. आता भारताला हव्या होत्या एक चेंडूत 4 धावा. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आणि घरी टीव्हीवर मॅच पाहणाऱ्या सगळ्या क्रिकेट लव्हर्सचे लक्ष्य रोहितकडेच होते. साउदी शेवटचा  टाकण्यासाठी धावला. साउदीने चेंडू टाकला आणि रोहितने त्याला जोरदार टोलवत लाँग ऑफमध्ये षटकार लगाविला. सर्व भारतीयांनी विजयाच्या आरोळ्या ठोकल्या आणि जल्लोषास सुरवात केली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत मैदानात धूम ठोकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com