esakal | INDvsNZ : 'नेव्हर गिव्ह अप'; किंग कोहलीच्या विराटसेनेनं घडवला इतिहास!
sakal

बोलून बातमी शोधा

Team_India

विजयाचं श्रेय हिटमॅन रोहित शर्माच्या वाट्याला गेलं असलं तरी याचा खरा हकदार आहे फास्ट बॉलर मोहम्मद शमी.

INDvsNZ : 'नेव्हर गिव्ह अप'; किंग कोहलीच्या विराटसेनेनं घडवला इतिहास!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

INDvsNZ : हॅमिल्टन : थरारक या शब्दाचा नेमका अर्थ काय? असं जर कुणी विचारलं तर त्यांना भारत आणि न्यूझीलंडमध्ये बुधवारी (ता.29) झालेली मॅच बघायला सांगा. टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये रंगलेली मॅच टीम इंडियाने आपल्या नावे केली. आणि न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी पळवले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विजयाचं श्रेय हिटमॅन रोहित शर्माच्या वाट्याला गेलं असलं तरी याचा खरा हकदार आहे फास्ट बॉलर मोहम्मद शमी. त्याने टाकलेली शेवटची 20वी ओव्हरही भारतासाठी तितकीच महत्त्वाची ठरली. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या सेट बॅट्समन केन विल्यमसन आणि रॉस टेलर या दोघांना तंबूचा रस्ता दाखवल्याने सामन्यात रंगत आली. आणि भारताला विजयाच्या संधी दिसू लागल्या. 

- INDvsNZ : 'हिटमॅन रोहित'चा सुपरस्ट्रोक; अशी झाली सुपर ओव्हर!

न्यूझीलंडने दिलेले 18 धावांचे टार्गेट पार करत टीम इंडियाने टी-20 मालिका 3-0 ने जिंकली. आणि न्यूझीलंडला त्यांच्यात भूमीत पराभवाची धूळ चारत विजयोत्सव साजरा केला. आणि हा भारताचा ऐतिहासिक विजय ठरला.

- चहल म्हणतो, ये माही भाई की जगह है, आज भी यहाँ कोई नही बैठता

या अगोदर टीम इंडियाने किवीजच्या भूमीवर दोनवेळा टी-20 मालिका खेळली असून त्यामध्ये फक्त एक सामना भारताने जिंकला होता. आणि न्यूझीलंडने दोन्ही वेळेस मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले होते. 2008-09 मध्ये भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळताना टीम इंडियाला पराभवास सामोरे जावे लागले होते. तसेच गेल्यावर्षीही तीन सामन्यांची मालिका 1-2 ने गमवावी लागली होती. 

- अमेरिकेचा बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा मुलीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

याची परतफेड करताना आज टीम इंडियाने किवीजला पराभूत करत मालिका विजयाची नोंद केली. हिटमॅन रोहित शर्माने शेवटच्या दोन बॉलवर ठोकलेले सिक्स सर्व क्रिकेट लव्हर्सच्या आठवणीत राहतील असेच ठरले आहेत.