esakal | INDvsNZ : 'गब्बर'ची जागा भरून काढण्याची जबाबदारी 'या' दोघांवर; न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर!
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar-Dhawan

सॅमसनला 'बीसीसीआय'च्या करारबद्ध खेळाडूंत स्थान मिळाले नव्हते, पण आता अडखळत्या कारकिर्दीत त्याला आणखी एक संधी मिळाली आहे.

INDvsNZ : 'गब्बर'ची जागा भरून काढण्याची जबाबदारी 'या' दोघांवर; न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : न्यूझीलंड दौऱ्यातील वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ अखेर जाहीर करण्यात आला. सलामीवीर शिखर धवन याला डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागेल. परिणामी, टी-20 संघात संजू सॅमसन, तर वन-डे संघात शैलीदार मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याची निवड झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही प्रमुख खेळाडू टी20 मालिकेसाठी सोमवारी (ता.21) रात्री न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक तिसऱ्या सामन्यात धवनच्या खांद्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. 'स्कॅन'नंतर त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीत 'रिहॅबिलिटेशन' साठी दाखल होईल.

- INDvsNZ : शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; हे तीन पर्याय

धवनची दुखापत पृथ्वी आणि सॅमसन यांच्या पथ्यावर पडली. पृथ्वी भारत 'अ' संघाकडून यापूर्वीच न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. त्याने नुकतेच सराव सामन्यात 100 चेंडूंत 150 धावांची खेळी केली. सॅमसनला 'बीसीसीआय'च्या करारबद्ध खेळाडूंत स्थान मिळाले नव्हते, पण आता अडखळत्या कारकिर्दीत त्याला आणखी एक संधी मिळाली आहे.

- 17 वर्षांच्या पठ्ठ्यानं टाकलं अख्तरला मागे; 175च्या स्पीडनं करतो बॉलिंग!

टी20 संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, महंमद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर

- ICC ODI Rankings : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंचा दबदबा कायम; जडेजाची एन्ट्री!

वन-डे संघ : विराट (कर्णधार), रोहित (उपकर्णधार), पृथ्वी, राहुल, अय्यर, पांडे, पंत (यष्टिरक्षक), दुबे, कुलदीप, चहल, जडेजा, बुमरा, शमी, सैनी, ठाकूर, केदार जाधव.