esakal | सानियाने 4 महिन्यात घटवलं तब्बल 26 किलो वजन; पाहा आता ती कशी दिसतेय?
sakal

बोलून बातमी शोधा

Sania-Mirza

गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला टीम इंडियाने पराभूत केल्यानंतर सानिया चर्चेत आली होती.

सानियाने 4 महिन्यात घटवलं तब्बल 26 किलो वजन; पाहा आता ती कशी दिसतेय?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांपासून दूर होती. मात्र, सोमवारी तिने एक फोटो शेअर करत टेनिसप्रेमी आणि नेटकऱ्यांना आपली पुन्हा एकदा आठवण करून दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सानियाने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला असून त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. कारण हा फोटो चर्चा होईल असाच आहे. आज शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने स्वत:चा चार महिन्यांपूर्वीचा आणि सध्याचा फोटो अपलोड केला असून त्याला चाहत्यांची वाहवा मिळत आहे. कारण सानियाने चार महिन्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल 26 किलो वजन घटवले आहे. 

- U19CWC Final : विजयाचा उन्माद बांगलादेशच्या अंगलट; खेळाडूंना भोगावी लागणार फळं!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिलिव्हरीच्या काळात सानियाचे वजन 89 किलो झाले होते. त्यानंतर तिने 26 किलो वजन कमी करत ते 63 पर्यंत आणले आहे. फोटो शेअर करताना तिने 89 विरुद्ध 63 असे कॅप्शन दिले असून एक छान संदेशही लिहला आहे. 'दैनंदिन आणि दूरगामी असे आपल्या सर्वांचे काहीना काही लक्ष्य असते. ते लक्ष्य पूर्ण केल्यावर आपल्याला आनंद होतो. आई झाल्यानंतर स्वस्थ आणि फिट होण्याचे माझे लक्ष्य होते. ते गाठण्यासाठी मला 4 महिने लागले. तुला हे जमणार नाही, असं म्हणणारे कितीतरी लोक तुमच्या आसपास असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपली स्वप्न जगा. जर मी हे करू शकते, तर तुम्हीही करू शकता.'

- Oscar 2020 : ऑस्करवर 'पॅरासाईट'चे वर्चस्व; पाहा कोणाला मिळाले पुरस्कार

डिलिव्हरीच्या काळात सानियाचे वजन खूप वाढले होते. मात्र, बाळाला जन्म दिल्यानंतर तिने टेनिसकोर्टवर परतण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यानंतर तिने जानेवारीमध्ये पार पडलेल्या होबार्ट इंटरनॅशनल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये नादिया किचेनोकसोबत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावत सर्वांना आश्चर्याचा धक्काही दिला होता. सप्टेंबर 2017 मध्ये तिने शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर जवळपास 27 महिन्यांनंतर तिने कोर्टवर पाऊल टाकले.

- Bushfire Cricket League : तिच्या विनंतीनंतर क्रिकेटचा देव उतरला मैदानात!

दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला टीम इंडियाने पराभूत केल्यानंतर सानिया चर्चेत आली होती. मॅचच्या अगोदरच्या दिवशी पाक क्रिकेट टीम शिशा कॅफेमध्ये बर्गर पार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी सानियाही त्याठिकाणी उपस्थित होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.

loading image