Breaking: धोनीनंतर टीम इंडियाच्या आणखी एका विकेटकीपरचा क्रिकेटला अलविदा!

टीम ई-सकाळ
Monday, 15 February 2021

२०१२ मध्ये नमनने डेव्हिड वॉर्नरसोबत दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची पार्टनरशिप केली होती, ही कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली आहे.

Naman Ojha Retirement: पुणे : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाच्या आणखी एका विकेटकीपर बॅट्समनने क्रिकेटला अलविदा केला आहे. नमन ओझाने आंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टीक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय नमनने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. टीम इंडियाकडून त्याने एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत.  २०१०मध्ये झिम्बाब्वे दौर्‍यादरम्यान नमन मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळला होता, तर २०१५मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे कारकिर्दीतील एकमेव कसोटी सामना खेळला होता.

INDvsENG : 'बाप-माणूस' पुन्हा खवळला; कोहलीनं 'इज्जत'मध्ये पंचाशी घातली 'हुज्जत'​

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये नमनने मध्यप्रदेशचे प्रतिनिधित्व करताना १४६ प्रथम श्रेणी सामने खेळले होते आणि ४१.६७च्या सरासरीने ९७५३ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २२ शतके आणि ५५ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद २१९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. तसेच १८२ टी-२० सामने आणि आयपीएलमध्ये ११३ सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स), राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला.

INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

२०१२ मध्ये नमनने डेव्हिड वॉर्नरसोबत दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची पार्टनरशिप केली होती, ही कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासातील ही पाचवी सर्वात मोठी पार्टनरशिप आहे. २०१८मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना नमनने त्याचा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला होता.

INDvENG : अश्विननं चौकार मारला आणि सिराजचा आनंद गगनाला भिडला (VIDEO)

निवृत्ती जाहीर करताना नमनचा कंठ दाटून आला होता. डोळ्यातून अश्रू ढाळत नमन म्हणाला, ''२० वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. हा एक मोठा प्रवास आणि माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. माझे प्रशिक्षक, निवड समितीमधील सदस्य, फिजिओ, कर्णधार, संघातील खेळाडू, माझे कुटुंब, हितचिंतक, मध्यप्रदेश संघ आणि बीसीसीआयचा आभारी आहे. राज्याकडून तसेच देशाकडून खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यात त्या सर्वांनी मदत केली आहे."

- क्रीडा विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian wicketkeeper batsman Naman Ojha announces retirement from all forms of cricket