esakal | Asia Cup : भारताच्या नकारामुळे पाकला गमवावे लागले यजमानपद!
sakal

बोलून बातमी शोधा

Asia-Cup-2020

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळविली जाणार आहे. 

Asia Cup : भारताच्या नकारामुळे पाकला गमवावे लागले यजमानपद!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून कुरबुरी सुरू असतात. रणभूमीच्या मैदनातील युद्ध असो किंवा खेळाच्या मैदानातील. दोन्ही देश एकमेकांवर वरचढ ठरण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. त्यामुळेच या दोन देशांतील द्वंद्वाकडे संपूर्ण जग डोळे लावून बसलेले असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांदरम्यान वातावरण गरम असताना आता पाकिस्तानवर आणखी एकदा मानहानी स्वीकारावी लागण्याची परिस्थिती ओढवली आहे. त्याचे कारण असे की, भारताने नकार दर्शविल्याने पाकिस्तानमध्ये होणारी आशिया कप 2020 ही स्पर्धा आता दुसऱ्या देशामध्ये हलविण्यात आली आहे.

- धोनीच्या निवृत्तीची घोषणाच बाकी?; बीसीसीआयच्या करारातून बाहेर

या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भूषविणार होते. मात्र, असुरक्षिततेच्या कारणास्तव भारताने नकार दिल्याने या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाची स्पर्धा दुंबई, बांगलादेश किंवा श्रीलंकेत आयोजित केली जाऊ शकते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार असून या स्पर्धेच्या महिनाभर आधी आशिया कप 2020 स्पर्धा भरविण्यात आली आहे. याचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, आता पाकिस्तानकडून हे यजमानपद काढून घेण्यात आलं आहे.

- टीम इंडियाच्या वयस्कर चाहत्या चारुलता यांचे निधन

यंदा आशिया कप स्पर्धा टी-20 प्रकारात खेळविली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघाचा सहभाग असतो.

- रोहित शर्माला 'वनडे'तील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा, तर विराट कोहलीला...

पाकिस्तानात 2008मध्ये अखेरची आशिया कप क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानात एकही आशिया कप स्पर्धा पार पडली नाही. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळविली जाणार आहे.