INDvsNZ : रोहित वन-डे मॅच खेळणार का? राहुल म्हणतोय...

IND-Rohit-Sharma
IND-Rohit-Sharma
Updated on

INDvsNZ : माऊंट मौगानुई : भारत-न्यूझीलंडमध्ये झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला स्नायू दुखावल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे तो पुढील सामना खेळणार की नाही, अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.

कॅप्टन विराट कोहलीने या सामन्यात विश्रांती घेत टीमची धुरा रोहितच्या हाती सोपवली. पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरत रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या भारतीय सलामीवीरांनी धडाक्यात सुरवात केली. रोहितने 3 फोर आणि 3 सिक्सच्या साहाय्याने 41 चेंडूत 60 रन्सची धुवाधार खेळी केली. 

मात्र, पोटरीचे स्नायू ताणले गेल्याने रोहितने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फिल्डिंगच्या वेळेस तो मैदानावर आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलने टीम इंडियाच्या कॅप्टनशीपची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे रोहित अनफिट आहे का? तो पुढील मॅच खेळणार का? याबाबत चर्चांना उधाण आले.

रोहितच्या फिटनेसची चिंता त्याच्या चाहत्यांसह टीमसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे रोहितच्या फिटनेसबाबत त्याचा जोडीदार राहुलने महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

राहुल म्हणाला, ''रोहितला अचानक त्रास व्हायला लागल्याने टीममधील सर्वच जण काळजीत पडले होते. त्याच्याबाबतीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण, लवकरच तो बरा होईल, अशी आशा आहे.'' 

या टी-20 मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ द सिरीज' म्हणून गौरविण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्याने याबाबतची माहिती दिली. 5 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वन-डे सीरिज सुरू होणार आहे. यापूर्वी रोहितच्या फिटनेसबद्दल नेमकी माहिती पुढे येईल. 

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना जिंकत भारताने इतिहास घडवला. यजमान न्यूझीलंडला त्यांच्यात भूमीवर टी-20मध्ये टीम इंडियाने व्हाईटवॉश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com