#AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी!

Novak-Djokovic
Novak-Djokovic

ऑस्ट्रेलियन ओपन 2020 : मेलबर्न : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. आणि नव्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले. 

जोकोविच आणि ऑस्ट्रियाचा तरुण टेनिसपटू डॉमनिक थिएम यांच्यात ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम थरार रंगला. जोकोविचने थिएमचा 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 अशा पाच सेट्सपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. 

दरम्यान, पहिल्या सेटमध्ये 6-4 अशी आघाडी घेत जोकोविचने धडाक्यात सुरवात केली. मात्र, हम भी किसी से कम नही म्हणत थिएमने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार मुसंडी मारली आणि सलग दोन सेट जिंकत सामन्यात रंगत वाढवली. 

आपला अनुभव पणाला लावत जोकोविचने चौथा सेट जिंकला आणि बरोबरी साधली. शेवटच्या सेटमध्ये दोघांनी आपल्या हुकमी फटक्यांचा खुबीनं वापर केला. मात्र, जोकोविच थिएमवर भारी पडला. 

आठवी फायनल आणि आठव्यांदा विजयी 

मॅटचा बादशहा अशी ओळख निर्माण केलेल्या आणि टेनिस विश्वात डी'जोकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोकोविचने नवा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची आठव्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या जोकोविचने फायनलमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम नोंदविला आहे.

त्याने आतापर्यंत या ग्रँडस्लॅम स्पर्धेची आठव्यांदा फायनल गाठली असून तो आठही वेळेस अजिंक्यच राहिला आहे.तसेच जोकोविचचे हे एकूण 17 वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले आहे. स्वित्झर्लंडचा जगप्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररच्या विक्रमापासून तो केवळ तीन पावले दूर आहे.

फेडररने आतापर्यंत 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांवर नाव कोरले असून जोकोविचच्या नावावर 17 ग्रँडस्लॅम जमा झाली आहेत. फेडररशी बरोबरी साधण्यासाठी जोकोविचला आणखी तीन ग्रँडस्लॅम जेतेपदं जिंकावी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com