INDvsNZ : विल्यमसन 'आउट'; टीम साउदी करतोय किवीजचे सारथ्य!

टीम ई-सकाळ
Friday, 31 January 2020

टीम इंडियाने रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि फिरकीपटू रविंद्र जडेजाला विश्रांती दिली असून त्यांच्याजागी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीला संधी दिली आहे.

INDvsNZ : वेलिंग्टन : भारत-न्यूझीलंडमध्ये आज चौथा टी-20 सामना येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, किवीजच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किवीज कॅप्टन केन विल्यमसनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज टीम साउदी त्याच्या अनुपस्थितीत कॅप्टनशिपची धुरा सांभाळणार आहे.

- INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी 

न्यूझीलंड आणि भारत दोन्ही संघांनी आज किरकोळ बदल केले आहेत. टीम इंडियाने रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि फिरकीपटू रविंद्र जडेजाला विश्रांती दिली असून त्यांच्याजागी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीला संधी दिली आहे. तर किवीजच्या ताफ्यात टॉम ब्रूस आणि डॅरियल मिशेल यांना दाखल करण्यात आले आहे.

- INDvsNZ : भावूक झालेल्या मोहम्मद शमीचा मुलीला स्पेशल मेसेज!

दरम्यान, तिसऱ्या टी-20 मध्ये मोहम्मद शमीच्या बॉलिंग आणि हिटमॅन रोहित शर्माच्या बॅटिंगचा करिष्मा सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे रोमहर्षक विजय मिळवत टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 3-0ने जिंकली. आणि न्यूझीलंडच्या भूमीवर टी-20 मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम करून दाखवला आहे.

- न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsNZ Shoulder Injury Rules Kane Williamson Out of Fourth T20I