esakal | INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

IND-Rahul-Rohit

टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

INDvsNZ : हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 मॅचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये अखेर टीम इंडियाने बाजी मारली असली तरीही न्यूझीलंडच्या टीमचे कौतुकही होताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिसऱ्या टी-20 सामन्यासह भारताने न्यूझीलंडविरुद्धही मालिकाही जिंकली. यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी अजब मागणी केली आहे. न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  

- न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर

बुधवारी (ता.29) झालेल्या सामन्यानंतर रॉबर्टसन यांनी आपली खंत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटले आहे की, ''लोकांची मानसिक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी, असे मला वाटते. यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (विल्यमसन, तू चांगला खेळलास)''

भारताचा सुपरहिट सलामीवीर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे जरी भारताच्या विजयाचे शिलेदार असले तरी चर्चा मात्र रोहितची झाली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननेही क्रिकेट फॅन्सचे चांगले मनोरंजन केले. 

- #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!

दरम्यान, गेल्या सहा महिन्यात न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा न्यूझीलंडच्या टीमने सुपर ओव्हर खेळली असून त्यामध्ये त्यांना सहा वेळा हार स्वीकारावी लागली आहे. केवळ एकदाच न्यूझीलंडला विजयाचा जल्लोष साजरा करता आला आहे. त्यामुळे निराश झालेल्या न्यूझीलंडच्या क्रीडामंत्र्यांनी आपली निराशा जगजाहीर केली आहे.

- जगातील सर्वोत्तम क्रीडापटूचा राणीला पुरस्कार

टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड संघांमध्ये तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांत न्यूझीलंड टीम कशी कमबॅक करते आणि टीम इंडिया आपला विजयीरथ कायम ठेवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

loading image