esakal | INDvsNZ : भावूक झालेल्या मोहम्मद शमीचा मुलीला स्पेशल मेसेज!

बोलून बातमी शोधा

Mohammed-Shami-Daughter

कॅप्टन केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर फूल फॉर्मात खेळत होते. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज असताना शमीने आपला अनुभव पणाला लावत टीम इंडियाचे मॅचमध्ये पुन्हा कमबॅक केले. 

INDvsNZ : भावूक झालेल्या मोहम्मद शमीचा मुलीला स्पेशल मेसेज!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

INDvsNZ : भारत-न्यूझीलंडमध्ये आज चौथा टी-20 सामना खेळला जाणार आहे. या दोन्ही संघांदरम्यान झालेला तिसरा टी-20 सामना सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या थराराने चांगलाच गाजला. आणि पाच सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने अगोदरच खिशात घातली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने केलेल्या फटकेबाजीची सगळीकडे चर्चा झाली. मात्र, भारताला पराभूत होण्यापासून वाचविणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या कोडकौतुकापासून दूर राहिला. 

आज वेलिंग्टन येथे चौथा सामना खेळला जाणार असून त्या अगोदरच मोहम्मद शमी भावूक झाल्याचे दिसून येत आहे. त्याला कारण आहे त्याची लहान मुलगी आयरा. आपल्या मुलीच्या आठवणीने शमी भावूक झाला असून त्याने आपल्या लाडक्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

- INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी

आयराचा फोटो शेअर करत शमीने म्हटले आहे की, 'बाळा, तू साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. देव तुला सुखात ठेवो. आपण लवकरच भेटू.' 

वसंत पंचमीनिमित्त शाळेत एका आयोजित कार्यक्रमात शमीची मुलगी साडी नेसून गेली होती. त्यावेळी काढलेला फोटो शमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

- न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर

दरम्यान, भारत-न्यूझीलंडमध्ये बुधवारी (ता.29) झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडपुढे विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य उभारले होते. धावांचा पाठलाग करत न्यूझीलंड विजयासमीप पोहोचले होते. त्यांचा कॅप्टन केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर फूल फॉर्मात खेळत होते. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज असताना शमीने आपला अनुभव पणाला लावत टीम इंडियाचे मॅचमध्ये पुन्हा कमबॅक केले. 

- INDvsNZ : सामना मी नाही, शमीने जिंकवला : रोहित शर्मा

आणि धोकादायक ठरत असलेल्या विल्यमसन आणि टेलरला बाद करत भारताला पराभूत होण्यापासून वाचवले. त्यामुळे सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरवर ढकलला गेला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 18 धावांचे आव्हान भारताने रोमहर्षकरित्या पूर्ण केले. शेवटच्या दोन चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना हिटमॅन रोहित शर्माने दोन्ही चेंडूंवर सिक्स ठोकले आणि क्रिकेटप्रेमींनी जल्लोषास सुरवात केली.