

Inzamam-ul-Haq : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघातील पहिला व्यक्तीचा राजीनामा आला आहे. संघाचा निवड समिती प्रमुख इंझमाम उल हकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पाकिस्तानचा टीव्ही चॅनल समा टीव्हीवरील एका कार्यक्रमात आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. त्याच्यावर नुकतेच हितसंबंधांच्या संघर्षाबाबतचा आरोप झाला होता.
याचबरोबर खेळाडूंच्या मॅनेजमेंट कंपनीमध्ये इंझमामची भागीदारी आहे असा आरोप होत आहे.
ज्या प्रकारे पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आणि बोर्डावर आरोप झाले त्यानंतर इंझमाम म्हणाला की, मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी बोर्डाने पाच सदस्यांची समिती या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली असल्याचे सांगितले.
यानंतर इंझमामने आपल्या पदाचा राजीनामा देेण्याचा प्रस्ताव ठेवला. जोपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत मी पदावरून पायउतार होतो असं इंझमाम म्हणाल्याचे त्याने सांगितले. याचबरोबर इंजमामने आम्ही क्रिकेटपटू आहोत त्यामुळे आम्ही पाकिस्तानसाठी कायम उभे राहणार असेही सांगितले.
इंझमाम हा याझो आंतरराष्ट्रीय लिमिटेड कंपनीमध्ये पार्टनर असल्याचा आरोप झाला आहे. या कंपनीचे प्रतिनिधित्व हे पाकिस्तान संघातील स्टार खेळाडू बाबर आझम, शाहीन अफ्रिदी, मोहम्मद रिझवान यांचा देखील समावेश आहे.
इंझमाम हा या कंपनीत पार्टनर आहे आणि तोच निवड समितीचा अध्यक्ष देखील आहे असा आरोप त्याच्यावर होत आहे. इंझमामवर हितसंबंधाच्या संघर्षाबाबतचा आरोप झाला आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हितसंबधाच्या संघर्षाबाबत झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.