esakal | IPL 2020 : दिल्लीकरांनी वाजवला डंका; धोनी मैदानात येऊनही चेन्नईचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

IPL_CSKvsDC

चेन्नईला विजयासाठी 176 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस येतो आणि संघाला जिंकून देतो का याकडे सर्वांचे लक्ष होते.

IPL 2020 : दिल्लीकरांनी वाजवला डंका; धोनी मैदानात येऊनही चेन्नईचा पराभव

sakal_logo
By
शैलेश नागवेकर

IPL 2020 : CSKvsDC : दुबई : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपीटलने चेन्नई सुपर किंग्जचा 44 धावांनी पराभव करुन यंदाच्या आयपीएलमधला दुसरा विजय मिळवला. महेंद्रसिंग धोनी मैदानात येऊनही तो संघाला वाचवू शकला नाही. 

चेन्नईला विजयासाठी 176 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस येतो आणि संघाला जिंकून देतो का याकडे सर्वांचे लक्ष होते; परंतु चेन्नईला 26 चेंडूत 78 धावांची गरज असताना धोनी मैदानात आला. पहिल्या चेंडूवर तीन आणि पुढच्या चेंडूवर चौकार मारुन त्याने शानदार सुरवात केली, परंतु विजयाच्या आव्हानातली दरी वाढत गेल्यामुळे धोनी आणि त्याच्या संघाच्या पदरी निराशाच आली. धोनीला 15 धावाच करता आल्या. 

#KXIPvsRCB - सामना गमावल्यानंतर विराटला आणखी एक दणका; झाला 12 लाख रुपयांचा दंड

पृथ्वी शॉ चमकला 
पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर शुक्रवारी पृथ्वी शॉची बॅट रंगात आली. पहिल्याच षटकात त्याच्या बॅटला लागून गेलेला चेंडू धोनीने पकडलाही होता, परंतु बॅट कट कोणालाही ऐकू आली नाही. या जीवदानाचा फायदा घेत पृथ्वीने काही शानदार चौकार मारत 64 धावांची खेळी केली. सावध सुरुवातीनंतर शिखर धवनही चमकला. या दोघांनी 94 धावांची सलामी दिली, परंतु डावाच्या मध्यावर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना धावांचा अपेक्षित वेग वाढवता आला नाही. त्यामुळे दिल्लीला 175 धावांवर समाधान मानावे लागले. 

जाणून घ्या आयपीएलमागच्या आर्थिक उलाढाली...​

संक्षिप्त धावफलक : 

दिल्ली : 20 षटकांत 3 बाद 175 (पृथ्वी शॉ 64 -43 चेंडू, 9 चौकार, 1 षटकार, शिखर धवन 35 -27 चेंडू 3 चौकार, 1 षटकार, रिषभ पंत 26 - 22 चेंडू, 1 चौकार, पियुष चावला 33-2) वि. चेन्नई : 20 षटकांत 20 षटकांत 7 बाद 131 (फाफ डुप्लेसी 43 -35 चेंडू, 4 चौकार, केदार जाधव 26 - 21 चेंडू 3 चौकार, रबाडा 26-2, नॉर्जे 21-2)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)