IPL 2022 : राशिदनं आपल्या गड्यासाठी लावली फिल्डिंग; रैनाचं काय?

Suresh Raina
Suresh RainaSakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 15 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) मोठा धक्का बसला. इंग्लिश क्रिकेटर जेसन रॉयने स्पर्धेतून माघार घेतली आहे. बायोबबलच्या त्रासाला वैतागून त्याने आयपीएल स्पर्धेपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनंतर आयपीएल स्पशलिस्ट सुरेश रैनाच्या (Suresh Raina) चाहत्यांना मोठा आनंद झाला होता. गुजरातच्या संघाने रैनाला संधी द्यावी, अशी मागणीही जोर धरु लागली. गुजरात टायटन्स अनसोल्ड रैनाला भाव देऊ शकतो, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. पण रैनाची गणितं बिघडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गुजरात टायटन्स संघ जेसन रॉयच्या जागी अफगानिस्तानच्या स्फोटक फळंदाज रहमानुल्लाह गुरबाज याला संघात घेणार असल्याचे वृत्त आहे. त्याने 20 मध्ये 150 पेक्षाही अधिक स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत. आतापर्यंत 69 टी 20 सामन्यात त्याने 113 षटकार खेचले आहेत. गुजरात टाइटन्स त्याच्याकडे जेसन रॉयचा पर्याय म्हणून बघत आहे. गुजरातने यासंदर्भात निर्णय पक्का केला असून ते बीसीसीआयच्या मंजूरीची प्रतिक्षा करत असल्याचे समजते. आयपीएल मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सनं राशिद खानवर 15 कोटींचा डाव खेळळा होता. त्यानेच गुरबाजसाठी फिल्डिंग लावल्याचे दिसते.

Suresh Raina
Shane Warne : जर्मन महिलेनंतर CCTV फुटेजमध्ये दिसल्या मसाज गर्ल्स

गुरबाजची फ्रँचायझी क्रिकेट कारकिर्द

गुरबाज पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुल्तान सुल्तान आणि इस्लामाबाद यूनाइटेड संघाकडून खेळला आहे. लंका प्रीमियर लीग मध्येही त्याने कँडी टस्कर्सचे प्रतिनिधीत्व केले असून बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये तो खुलना टायगर्सकडून खेळताना पाहायला मिळाले आहे. आयपीएल लिलावात त्याने नाव नोंदणी केली होती. 50 लाख मूळ किंमत असूनही तो अनसोल्ड राहिला होता.

Suresh Raina
Womens World Cup Points Table : पाकिस्तान तळाला; भारतीय महिला संघ कुठे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com