वॉर्नर 'या' भारतीय खेळाडूला विचारतोय आपण कोणत्या संघात असणार?

IPL 2022 Mega Auction David Warner video on pushpa film of allu arjun
IPL 2022 Mega Auction David Warner video on pushpa film of allu arjunsakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामासाठी लवकरच मेगा लिलाव होणार आहे. यानंतर मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेची तयारी केली जाईल. यासह, सर्व 10 संघ मेगा लिलावासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह अनेक स्टार खेळाडूही लिलावासाठी सज्ज दिसत आहेत.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर यावेळी मेगा लिलावात सहभागी होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सह सर्व संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात. असाच एक प्रश्न वॉर्नरने भारतीय खेळाडू सिद्धार्थ कौलला सोशल मीडियावर विचारला आहे.

वॉर्नरने 'पुष्पा: द राइज' चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनच्या जागी आपला चेहरा ठेवला आहे. सिद्धार्थ कौलनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले - एपिक आहे भाऊ. यावर भाष्य करताना वॉर्नर म्हणाला- बरोबर भाऊ, या वर्षी आपण कोणत्या संघात असू?

आयपीएल गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरचे कर्णधारपद काढून घेतले होते. तसेच त्याला संघातूनही डच्चू मिळाला होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर नाराज झाला होता. मात्र त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दमदार कामगिरी करत आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी आपली दावेदारी प्रबळ केली आहे.

IPL 2022 Mega Auction David Warner video on pushpa film of allu arjun
Video: सचिन तेंडुलकर प्रजासत्ताक दिनी कोणत्या अधिकाराबद्दल बोलतोय?

वॉर्नरने पुष्पा चित्रपटाचे अनेक व्हिडिओ केले शेअर

डेव्हिड वॉर्नर सातत्याने भारतीय चित्रपटांचे संवाद आणि ट्रेलरचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. यासोबतच ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोशल मीडियावरही सक्रीय असतात. याआधीही वॉर्नरने पुष्पा चित्रपटाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये त्याच्या मुली पुष्पा चित्रपटातील 'सामी-सामी' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. त्याचवेळी, आणखी एका व्हिडिओमध्ये वॉर्नर अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये संवाद बोलताना दिसत आहे.

IPL 2022 Mega Auction David Warner video on pushpa film of allu arjun
पाकिस्तानच्या थव्यात टीम इंडियाची स्मृती चमकली!

त्याचबरोबर वॉर्नरची आयपीएलमधील कामगिरीही चांगली होती. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये एकूण 150 सामने खेळले आणि 41.6 च्या सरासरीने 5449 धावा केल्या. याच चार शतकांचा देखील समावेश आहे. याचबरोबर त्याने कर्णधार असताना संघाला 2016 मध्ये विजेतेपदही मिळवून दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com