
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारचा दिवस तुफानी ठरला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री फक्त चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात पाऊस पडला.
या सामन्यात तब्बल ४९० धावापेक्षा अधिक धावा झाल्या. त्यातही हा सामना हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने वादळी शतक करत गाजवला. त्यामुळे हैदराबादने हा सामना ८ विकेट्स आणि ९ चेंडू राखून जिंकला.